सलगरा(म.)ग्रामपंचायत उपसरपंचपदी मनोज सोमवंशी
जळकोट, दि.३०(मेघराज किलजे)
जळकोट येथून जवळच असलेल्या सलगरा(मड्डी) ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी मनोज दिलीप सोमवंशी यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे .
सलगरा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदाची निवड करण्यासाठी सरपंच सुनीता अप्पाराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आली होती. गावचे उपसरपंच हरीश ज्ञानेश्वर बेंडकाळे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. या पदावर माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप सोमवंशी यांचे चिरंजीव मनोज सोमवंशी यांची निवड करण्यात आली. उपस्थित सदस्यांनी एकमताने निवड प्रक्रियेत सहभाग नोंदवला..
यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र ईटकर,मीनाक्षी चंद्रकांत वाघमारे ,मल्लिकार्जुन नरसा वाघमारे , बायावा विलास रोट्टे, मिनाक्षी विठ्ठल शिरगिरे आदि ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. या निवडीनंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला.