spot_img
spot_img
spot_img
spot_img

महिला घेतायेत संगणकाचे धडे, एआयकडे नवी पिढी ; श्री कॉम्प्युटर्सचा गौरीनिमित्त देखावा 

महिला घेतायेत संगणकाचे धडे, एआयकडे नवी पिढी ; श्री कॉम्प्युटर्सचा गौरीनिमित्त देखावा

जळकोट, धाराशिव लक्षवेध दि.१(मेघराज किलजे)

गणरायाच्या आगमनानंतर गौरीचे घरात आगमन होत असते. गौरी आवाहन, गौरीपूजन व गौरी विसर्जन अशा तीन दिवसांचा महिलांचा मोठा उत्सव असतो. एकमेकांच्या. व शेजारी पाजाऱ्यांच्या सहकार्यातून घराघरात गौरी उभ्या केल्या जातात. विविध प्रकारचे आरास व देखावे सादर करण्यासाठी महिला वर्गामध्ये जणू स्पर्धा असते. अशा स्पर्धेच्या युगात एआय तंत्रज्ञान येऊ घातले आहे. तर महिला सक्षमीकरणासाठी पुढे पाऊल टाकले जात आहे. अशा धर्तीवर तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील श्री कॉम्प्युटर्सने संस्कृतीचे जतन करत महिला संगणकाचे धडे घेताहेत तर नवी पिढी एआय तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. असा देखावा गौरीनिमित्त सादर केला आहे.
जळकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील श्री कॉम्प्युटर्सने यावर्षीच्या गौरीनिमित्त आत्मनिर्भर्तेकडे भारत झेप घेत असताना, संगणकाच्या महत्त्वावर देखावा सादर केला आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ संचलित श्री कॉम्प्युटर्स हे वेगवेगळ्या योजने संदर्भात विद्यार्थ्यांना व महिला सतत प्रशिक्षण व मार्गदर्शन करत असते. या संगणक केंद्रातून हजारो विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत प्रशिक्षण देण्यात आले आहे. श्री कॉम्प्युटर्सच संचालक श्री. लक्ष्मीकांत पाटील यांनी कल्पकतेतून आपल्या संगणक केंद्रात भारतीय महिला आपली संस्कृती जपत संगणकाचे धडे घेत आहेत. डोक्यावरचा पदर घेऊन या महिला संगणकवर क्लिक करत आहेत. भारतीय संस्कृतीचे जतन करत महिला आत्मनिर्भर बनत असल्याचे चित्र तर एका बाजूला नवी पिढी नव्या भविष्यासाठी एआय तंत्रज्ञान शिकत आहेत. भविष्यात येऊ घातलेल्या एआय तंत्रज्ञान भावी पिढीसाठी फारच उपयुक्त आहे. हे तंत्रज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचावे. महिलांना संगणकामध्ये आत्मनिर्भर करून नव्या जगाची ओळख व्हावी. यासाठीच हा देखावा सादर करण्यात आला आहे. या देखाव्याचे सर्वत्र केले जात आहे. या देखाव्याच्या माध्यमातून महिलांची प्रगती व्हावी. त्यांच्यापर्यंत योजनेची माहिती जावी. नव्या पिढीला एआय तंत्रज्ञान कळावे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भविष्याचे येऊ घातलेल्या संधी कशा आहेत. याबाबत जनजागृती करण्यासाठी देखावा सादर केल्याचे श्री कॉम्प्युटर संचालक संचालक श्री. लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले. या कामी श्री कॉम्प्युटर सेंटरच्या सहाय्यक संचालिका सौ. ज्योती पाटील व महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान(उमेद) च्या चिकुंद्रा येथील केशर जाधवर यांनी सहकार्य केल्यामुळे हा देखावा सादर केल्याचे पाटील यांनी सांगितले.

Related Articles

भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने किटचे वाटप 

भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने किटचे वाटप   अणदूर (लक्ष्मण नरे)   तुळजापूर तालुक्यातील जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री खंडोबा श्रीक्षेत्र अणदूर, मैलारपूर, नळदुर्ग देवस्थान...

शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ अनिता मुद्दकण्णा तर व्हाईस चेअरमनपदी अनिल गुरव यांची निवड 

शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ अनिता मुद्दकण्णा तर व्हाईस चेअरमनपदी अनिल गुरव यांची निवड   अणदूर ( लक्ष्मण नरे)   शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी सहकारी सेवकांची सहकारी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!