जळकोट,वागदरी परिसरात गौरीचे स्वागत ; आकर्षक सजावट करून थाटात गौरी पूजन
जळकोट, साप्ताहिक धाराशिव लक्षवेध दि.१(मेघराज किलजे)
गणरायाच्या आगमनानंतर लगेचच एक – दोन दिवसानी गौरी लक्ष्मीचे आगमन होत असते. तुळजापूर तालुक्यातील जळकोट, वागदरी परिसरातील गावामध्ये सोनपावलानी गौरीचे आगमन झाले असून, अत्यंत मनोभावे घराघरात भक्तांनी आपापल्या घरी गौरी लक्ष्मीचे स्वागत उत्साहाने कऱण्यात आले.
प्रतिवर्षा प्रमाणे याहीवर्षी गौरी लक्ष्मीचे आगमन होताच जळकोट ,वागदरी व परिसरात ज्यांच्या घरी लक्ष्मी बसवली जाते. तिथे सुगंधी अगरबत्ती, फुल, निरंजन पेटवून आपापल्या परीने आकर्षक सजावाट व विद्युत रोषणाई करून , गोडधोड पदार्थ, फळे, फुले, पुरण पोळीचे नैवैद्य दाखविला.गौरी लक्ष्मीचे पुजन करुन उत्साही वातावरणामध्ये गौरी लक्ष्मीचा सण साजरा करण्यात येत आहे.