संस्कृती दुपारगुडे हिची नवोदय विद्यालयासाठी निवड ; विविध स्तरातून अभिनंदन
अणदूर, साप्ताहिक धाराशिव लक्षवेध
तुळजापूर तालुक्यातील जवाहर विद्यालय, अणदूर येथील इयत्ता सहावी मधील संस्कृती लक्ष्मण दुपारगुडे हिची जवाहर नवोदय विद्यालय,तुळजापूर येथे प्रतिक्षा यादी मधून निवड झाली आहे.विद्यालयात शांत,संयमी, मनमिळाऊ,अभ्यासू,अभ्यासात सतत अग्रेसर,वक्तृत्व-निबंध स्पर्धेत सतत अव्वल स्थानी असणारी गुणवंत विद्यार्थींनी म्हणून तिची ओळख होती.नवोदय विद्यालय येथे निवड झाल्याबद्दल संस्थेचे सचिव रामचंद्र आलुरे,मार्गदर्शक, जेष्ठ विधीज्ञ लक्ष्मीकांत पाटील, मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष कौतुक केले आहे.