बच्चु कडू यांच्या आंदोलनाला यश; दिव्यांग व्यक्तींच्या मानधनात वाढ मयुर काकडे यांची माहिती
जळकोट, धाराशिव लक्षवेध दि.३(मेघराज किलजे)
महाराष्ट्र शासनाच्या मंत्रीमंडळ बैठकीत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना यातील दिव्यांग लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्यात मोठी वाढ करण्यात आली आहे.
पूर्वी या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दर महिना ₹१५०० इतके मानधन मिळत होते. आता त्यात ₹१००० ची वाढ करून एकूण ₹२५०० प्रति महिना इतके सहाय्य मिळणार आहे. हा निर्णय सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणार असून, यासाठी बच्चु कडू यांच्या सातत्यपूर्ण आंदोलनाला यश आले आहे.
*आंदोलनाचा प्रवास*
या निर्णयासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने राज्यभरात लढा उभारला. बच्चुभाऊंच्या नेतृत्वाखाली टेंबा आंदोलन, चक्का जाम आंदोलन, राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय आंदोलन मोठ्या प्रमाणावर करण्यात आले.
* धाराशिव जिल्ह्यात प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने झाली. जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी स्वतः पुढाकार घेऊन या संघर्षाला बळ दिले. त्यांच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळेच हा निर्णय शक्य झाला आहे.
* आंदोलनात योगदान देणारे कार्यकर्ते*
या चळवळीत जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. यात बाळासाहेब कसबे, जमीर शेख, बाळासाहेब पाटील, महेश माळी, शिवाजी चव्हाण, महादेव चोपदार, चित्रा शिदे, गोकर्ण कोळगे, इसाक शेख, तानाजी मगर, दत्ता पवार, चव्हाण विठ्ठल, धोंडीराम राठोड, दत्ता कोळगे, उत्तम शिंदे, दिनेश पोद्दार, सुनील मगर, आप्पा उपरे, अभिजीत साळुंखे, कालू जाधव, मास्ती बाघमारे, कैलास यादव, गणेश शिंदे, नारायण साखरे, रमेश सावंत, नितीन सगरे, पैगंबर मुलानी, शिवाजी पोतदार, सचिन डोंगरे, रामदास मते, हरिदास कुंभार, शशिकांत गायकवाड, दशरथ भाकरे, आत्माराम बनसोडे, अनिल महाबोले, दिगंबर गाढवे, बजरंग गव्हाळे, नवनाथ कचार, आकाश गलांडे, राजेंद्र देशमुख, नागराज मसरे, रामेश्वर मदने, नरहरी ढेकणे, गौतम दुधे, विकास शिरसागर, तुकाराम कदम, नारायण लोंढे, हेमंत उंदरे, मलताबाई कोळगे, राणी मुसळे, गणेश पांढरे, इंद्रजीत मिसळ, नागनाथ वाघमारे, संतोष माळी, रूपाली शिरसागर, सूर्यकांत इंगळे, रवी शित्रे, प्रशांत भांजे, रोहित बारस्कर, महावीर कोंडेकर, अमोल पाडे, श्रीकांत वाघमोर, किशोर कांबळे, राजेंद्र अनभुले, किसन शिंदे, आनंद ननवरे, सद्दाम शेख, कृष्णकांत केसकर, तेजस घोडके, आप्पा नाईक, मारुती वाघमारे, सचिन बारकुल, ज्ञानेश्वर माळी, हरेश्वर कुंभार, धनंजय खांडेकर, शेख सलुबीर, मुस्तफा शेख, नागनाथ कोरे, बाबा साळुंखे, गणेश जगताप, आलीमोदीन कोतवाल, रवी शिखरे, रामहरी माळी, जाधव हरिबा, गौतम कांबळे व इतर अनेक कार्यकर्त्यांचे योगदान राहिले आहे.
या निर्णयामुळे राज्यातील हजारो दिव्यांग लाभार्थ्यांना दिलासा मिळणार असून त्यांच्या जगण्याला खऱ्या अर्थाने बळकटी मिळेल. बच्चुभाऊंच्या लढ्याला यश मिळाल्याने दिव्यांग समाजामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.