जळकोट : शिक्षकांचा श्री कॉम्प्युटर्सच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मान
जळकोट, धाराशिव लक्षवेध दि.४(मेघराज किलजे)
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अंतर्गत असलेल्या श्री कॉम्प्युटर्सच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त पार्वती कन्या प्रशाला, जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा व संभाजीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. श्री कॉम्प्युटरच्यावतीने पार्वती कन्या प्रशालेच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात मुख्याध्यापिका सौ. लता सोमवंशी – कदम, सहशिक्षक श्री.विजयकुमार मोरे,श्री.अभिमन्यू कदम,श्रीमती सुजाता होटकर,श्रीमती रोहिणी तळेकर,श्री. पंढरीनाथ कदम,श्री.सचिनकुमार गुड्ड,श्री.बसवराज मडोळे,विशाल कदम यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेचे मुख्याध्यापक रमेश कस्पटे, सहशिक्षक अब्दुल शेख, मीना बनसोडे, वर्षा बनसोडे, सत्यभामा लासुने, विना विटकर, सुरेखा राठोड, रोहित माने यांचा तर संभाजीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका महानंदा महामुनी, महादेवी रेणुके, निळकंठ इटकरी, धनराज कुडकले, दिनकर वनवे, गजानन मुरमुरे व सत्यवान अभिवंत, श्रीकांत कदम या शिक्षकांचा सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात पार्वती कन्या प्रशालेच्या सेविका ज्योसना लाळे व जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत अनेक वर्षापासून सेवा बजावणाऱ्या इंदुबाई नेताजी गंगणे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.