अणदूर: धाराशिव जिल्हा युवा महोत्सव ८ व ९ सप्टेंबर रोजी जवाहर महाविद्यालयात आयोजन ; जिल्ह्यातील युवक, नागरिकांनी उपस्थित राहण्याचे डॉ प्राचार्य उमाकांत चनशेट्टी यांची आवाहन.
अणदूर (लक्ष्मण नरे)
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे दि.८ व ९ सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर व जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अणदुर यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव जिल्हा युवा महोत्सव २०२५ चे आयोजन जवाहर महाविद्यालय अणदूर येथे करण्यात आलेले आहे.या युवा महोत्सवाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या शुभहस्ते व शिक्षण प्रसारक मंडळ अणदूरचे सचिव तथा सरपंच रामचंद्र आलूरे यांच्या अध्यक्षतेखाली व तसेच सिने अभिनेता टी.व्ही. स्टार मुंबईचे उमेश जगताप,जवाहर महाविद्यालय विकास समितीचे प्रा. भालचंद्र बिराजदार,ज्येष्ठ विधीज्ञ उच्च न्यायालय छत्रपती संभाजी नगरचे ॲड लक्ष्मीकांत पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.अंकुश कदम व्यवस्थापन परिषद सदस्य, डॉ बसवराज मंगरुळे, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगरचे विद्यार्थी विकास मंडळ,संचालक डॉ. कैलास अंभूरे, प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, उपप्राचार्य डॉ. मल्लिनाथ लंगडे यांच्या उपस्थितीत ८ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक १० वा. उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.तसेच दि.९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वा. पारितोषिक वितरण व समारोप समारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा. मधुकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व सिने अभिनेता टी.व्ही. स्टार मुंबई, योगेश शिरसाट व ज्येष्ठ अभिनेत्री रूप लक्ष्मी चौगुले शिंदे ,शिक्षण प्रसारक मंडळ अणदूरचे सचिव, तथा सरपंच रामचंद्र आलूरे,जवाहर महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ज्येष्ठ विधीज्ञ उच्च ॲड. लक्ष्मीकांत पाटील,व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.अंकुश कदम,बसवराज मंगरूळे,प्राचार्य डॉ.उमाकांत चनशेट्टी,डॉ. कैलास अंभूरे,धाराशिव जिल्हा समन्वयक प्राचार्य डॉ .संदीप देशमुख याची उपस्थिती असणार आहे तर यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी, पंचरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत नाडापुडे ,सिने अभिनेते व दिग्दर्शक दिलीप भोसले यांचे विशेष सन्मान होणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील महाविद्यालयीन युवकांना प्रतिष्ठित नागरिक बंधू-भगिनींना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी व डॉ अंकुश कदम यांनी दोन दिवस संपन्न होणाऱ्या युवा महोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार परिषदेमध्ये केले. यावेळी उपप्राचार्य डॉक्टर मल्लिनाथ लंगडे,आयोजक डॉ विवेकानंद वाहुळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ मल्लिनाथ बिराजदार यांची उपस्थिती होती.
या युवा महोत्सवात धाराशिव जिल्ह्यातील ६२ पैकी ४७ महाविद्यालयातील एकूण ४०० पेक्षा अधिक विद्यार्थी भारतीय शास्त्रीय गायन, भारतीय शास्त्रीय तालवाद्य, भारतीय शास्त्रीय सुरु वाद्य, नाट्य संगीत, भारतीय सुगम गायन, भारतीय समूह गायन, लोक वाद्यवृंद, पाश्चात्य सुगम गायन, पाश्चात्य वाद्य वादन, पाश्चात्य समूह गायन, भारतीय शास्त्रीय नृत्य, लोक आदिवासी नृत्य, वक्तृत्व, वादविवाद, प्रश्नमंजुषा, नकला, एकांकिका, प्रहसन, मुक अभिनय आणि रांगोळी इत्यादी कलाप्रकारात सहभागी होत असून उद्घाटन समारंभ पूर्वी गावातील प्रमुख रस्त्यावरून शोभायात्रा निघणार आहे. यावेळी नागरिक महिला युवकांनी या युवक महोत्सवाच्या विविध कार्यक्रमाचा उपस्थित राहून आस्वाद घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.