पाल्यासोबतच पालकांनाही मार्गदर्शनाची
गरज – अप्पर जिल्हाधिकारी करमरकर
गरज – अप्पर जिल्हाधिकारी करमरकर
—————————————
पांचजन्य सामाजिक वाढदिवस महोत्सव समितीच्या वतीने गौरी, वक्तृत्व स्पर्धा व सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न
अणदूर, लक्ष्मण नरे
पाल्यांसोबतच पालकांनाही मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.काय करावे किंवा काय करू नये हे दोघांनाही हे सांगणे अत्यंत गरजेचे आहे.चांगले वाईट गोष्टी मुलांना सांगणे हे आई-वडिलांचे कर्तव्य असल्याचेही मत लातूरच्या अप्पर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांनी बोलताना व्यक्त केले. त्या अणदूर येथील पांचजन्य सामाजिक संस्थेच्या वतीने रविवारी (दि.१४) आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक भगीरथ कुलकर्णी गुरुजी हे होते तर यावेळी सेवानिवृत मुख्याध्यापक सुहास कंदले गुरुजी, पत्रकार शिवाजी कांबळे, उद्योजक करबसप्पा(पपू) धमुरे, वैद्यकीय अधिकारी डॉ पंकज घुगे, सामाजिक कार्यकर्ते राजकुमार गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की,संस्कृती टिकवण्याचे कार्य महिलांनी केले आहे.महिलांच्या योगदानातूनच आजही भारताची संस्कृती टिकून आहे. मुलांना चांगल्या शिक्षणाबरोबरच संस्कार देणे अत्यंत गरजेचे आहे.हे संस्कारच ते पुढील त्यांच्या जीवनामध्ये उपयुक्त ठरतात. जीवन जगत असताना प्रत्येकाने आपली तत्त्वे पाळणे अत्यंत गरजेचे आहे.हे तत्व आपल्याला आयुष्यभर मन जगण्यासाठी उपयुक्त ठरतात असे करमरकर म्हणाल्या.
विद्यार्थ्यांनी व पालकांनी वाचन संस्कृती जपावे. विविध पुस्तके वाचन करावीत. पुस्तकाच्या माध्यमातून वाचन केल्याने ज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडतो असे मत सेवानिवृत्त मुख्याध्यापक भगीरथ कुलकर्णी गुरुजी यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल घुगे,सूत्रसंचालन अमोल गुड्ड व श्रद्धा दुपारगुडे यांनी तर आभार डॉ पंकज घुगे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबुराव मुळे,शिवशंकर तिरगुळे,लक्ष्मण नरे, राहुल घोडके,सचिन तोगी,सचिन गुड्ड,युवराज करपे, महादेव स्वामी,सुधीर ठाकूर,बसवेश्वर निसरगुंडे, अमोल कांबळे,इरफान खानापुरे, यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक,महिला व विद्यार्थी उपस्थित होते.
चौकट
पारितोषिक प्राप्त विजेते –
यावेळी गौरी देखा स्पर्धेत प्रथम आलेल्या नंदिनी स्वामी- दळवी प्रथम,द्वितीय अलका बिराजदार तर तृतीय सन्मती कंदले यांनी मिळविला.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम श्रद्धा दुपारगुडे, द्वितीय समृद्धी घोडके,तृतीय बुशरा टीनवाले तर सामान्य ज्ञान स्पर्धेत मोठ्या गटात संस्कृती घोडके प्रथम,भक्ती कबडे द्वितीय, चरण पोतदार तृतीय तर लहान गटातून दिया पांढरे प्रथम,स्वरा घोडके व्दितीय,आदित्य घोडके तृतीय क्रमांक मिळविला तर राज दुधभाते व मनस्वी बेटकर यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.प्रथम आलेल्या सर्वांना ५ हजार रुपये, द्वितीय आलेल्यांना २ हजार तर तृतीय आलेल्यांना १ हजार तर उत्तेजनार्थ पाचशे रुपये प्रत्येकी बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.