spot_img
spot_img
spot_img
spot_img

जवाहर मध्ये मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त धजारोहण व स्वातंत्र्य सेनानींच्या वारसांचा सत्कार

जवाहर मध्ये मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त धजारोहण व स्वातंत्र्य सेनानींच्या वारसांचा सत्कार

 

अणदूर धाराशिव लक्षवेध दि १७ सप्टेंबर

जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अणदूर येथे आज ७७ वा ‘ मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ‘ साजरा झाला.सकाळी  विद्यालयात स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ व प्रबोधनकार केशव ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी यांनी केले.अणदूर विद्यानगरीमध्ये प्रभातफेरी निघाली.प्रभातफेरीत राष्ट्रपुरूषांचा नामघोष करण्यात आला.प्रभातफेरी विद्यालयात आल्यावर संस्थेचे सचिव तथा सरपंच रामचंद्र आलुरे यांनी स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ व प्रबोधनकार केशव ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यालयात ध्वजारोहण संपन्न केले.

 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित हुतात्म्यांच्या कुटुंबियांचा/वारसदारांचा यथोचित सत्कार रामचंद्र आलुरे व अशोकराव चिंचोले यांनी संपन्न केले,त्यामध्ये खंडेराव चव्हाण,सुधाकर मुळे,नवनाथव संगशेट्टी,बसवराज घुगरे,उमाकांत स्वामी,गुंडाप्पा कुंभार,मनोज स्वामी.रमजान शेख,रविंद्र पोतदार यांना गौरविण्यात आले.अध्यक्षीय समारोपात रामचद्र आलुरे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास वाचा, हौतात्म्य पत्कारून आपणास स्वातंत्र्य मिळवून देणा-या प्रती आपण आदर बाळगावा, स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्राॅफ यांची बलिदान विसरून चालणार नाही,पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान मोठे आहे अशा भावना व्यक्त करून,आपल्या जबाबदारींची जाणीव करून दिली.

 

यावेळी गावातील माजी सरपंच धनराज मुळे,ग्रा.प.सदस्य बालाजी घुगे,माणिक आलुरे,रविंद्र घोडके,सेवानिवृत्त मुख्याध्यापक व गुरूजन दिंगबर काळे,हाणमंत घुगे,कैलास‌ बोंगरगे,सारणे,लिंबाजी सुरवसे,चांगदेव गायकवाड,लंगडे,साताप्पा व्हलदुरे,मल्लिनाथ कोंडले इत्यादी उपस्थित होते.शेवटी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते खाऊवाटप करण्यात आला.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.रोहित मोरे यांनी तर आभार मकरंद पाटील यांनी केले.

Related Articles

भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने किटचे वाटप 

भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने किटचे वाटप   अणदूर (लक्ष्मण नरे)   तुळजापूर तालुक्यातील जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री खंडोबा श्रीक्षेत्र अणदूर, मैलारपूर, नळदुर्ग देवस्थान...

शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ अनिता मुद्दकण्णा तर व्हाईस चेअरमनपदी अनिल गुरव यांची निवड 

शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ अनिता मुद्दकण्णा तर व्हाईस चेअरमनपदी अनिल गुरव यांची निवड   अणदूर ( लक्ष्मण नरे)   शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी सहकारी सेवकांची सहकारी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!