जवाहरच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
अणदूर, धाराशिव लक्षवेध
जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अणदूर येथील तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.दि.4,5 नोव्हेंबर रोजी लातूर येथे विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी सात विद्यार्थी खेळाडूंची निवड झाली होती,त्यापैकी थाळीफेक मध्ये सय्यद अरबाज-विभागातून प्रथम आला,धावणे पंधराशे मीटर मध्ये हागलगुंडे ओम विभागात व्दितीय तर तिहेरी उडीत लंगडे अनुष्का विभागात प्रथम आली.या यशस्वी खेळाडुंची निवड डेरवण जि.रत्नागिरी येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे.त्यासाठी संस्थेचे सचिव रामचंद्र आलुरे,जेष्ठ विधीज्ञ लक्ष्मीकांत पाटील,विद्यार्थी सुरक्षा समिती विधीज्ञ सदस्य नागनाथ कानडे,मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी यांनी यशवंत विद्यार्थी व क्रीडा मार्गदर्शक जयहिंद पवार,राजेश गीते,ठाकरू राठोड, प्रणीलकुमार बनसोडे, दादाराव घोडके,अंकुश मोकाशे यांचे अभिनंदन केले आहे व राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.






