spot_img
spot_img
spot_img
spot_img

मतदार संघा बाहेरील उमेदवार नको ; शहापूर जिल्हा परिषद मतदार संघात कार्यकर्त्यांची मागणी ..!

मतदार संघा बाहेरील उमेदवार नको ; शहापूर जिल्हा परिषद मतदार संघात कार्यकर्त्यांची मागणी

धाराशिव लक्षवेध ,प्रतिनिधी दि.५

शहापूर जिल्हा परिषद मतदार संघातून बाहेरील उमेदवार नको हा सूर धरू लागला आहे. इटकळ येथील साई मंगल कार्यालयात झालेल्या भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात स्थानिक कार्यकर्त्यांनी हा मुद्दा उचलून धरला. प्रत्येक वेळेस शहापूर जिल्हा परिषद मतदार संघामध्ये बाहेरील उमेदवार उभा राहतो. त्यांच्यासाठी कार्य करण्याचे काम कार्यकर्त्यांना येते. निवडून आलेला नेता म्हणून गायब होतो आणि स्थानिक समस्यांना येथील कार्यकर्त्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शहापूर जिल्हा परिषद मतदार संघामध्ये स्थानिक मतदारसंघातीलच उमेदवार द्यावा ही मागणी जोर धरु लागली आहे. यावेळी शहापूर जिल्हा परिषद मतदार संघातील गटप्रमुख, गणप्रमुख व बूथ प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या विकास कामावरती चर्चा केली. शहापूर मतदारसंघातून भरघोस मतांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे व जिल्हा परिषद सह आणि दोन्ही पंचायत समिती निवडून आणण्याचा निर्धार केला. यावेळी विविध गावातील नेतेमंडळी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक,यासह विविध भारतीय जनता पार्टी सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

श्री खंडेराया दर्शनासाठी भाविकांची गर्दी ; कट्टा ग्रुपच्या वतीने अन्नदान ——————————— यात्रा कमिटीच्या वतीने उद्या जंगी कुस्त्यांचे मैदान

श्री खंडेराया दर्शनासाठी भाविकांची गर्दी ; कट्टा ग्रुपच्या वतीने अन्नदान --------------------------------- यात्रा कमिटीच्या वतीने उद्या जंगी कुस्त्यांचे मैदान --------------------------------- अणदूर,News धाराशिव लक्षवेध   तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील लेखी करारपद्धतीने देव...

खासदार सुप्रियाताई सुळे यांना आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे  तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी खळबळ जनक पत्र

खासदार सुप्रियाताई सुळे यांना आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे  तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी खळबळ जनक पत्र   News धाराशिव लक्षवेध   तुळजापूरचे भाजपा आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी राष्ट्रवादी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!