ग्रामसेवक महेश मोकाशे यांना जिल्हास्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर
—————–
तुळजापूर तालुक्यातील एकमेव आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून निवड
धाराशिव लक्षवेध प्रतिनिधी दि.६
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील रहिवाशी तथा सध्या दहिटणा (ता.तुळजापूर) येथे ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) म्हणून कार्यरत असलेले महेश विठ्ठलराव मोकाशे यांना जिल्हा परिषद धाराशिव यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी (आदर्श ग्रामसेवक) हा पुरस्कार दि.३ रोजी जाहीर झाला आहे.या पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषद धाराशिव येथे करण्यात येणार होते. मात्र निवडणूक आदर्श आचारसंहिता लक्षात घेता पुरस्कर वितरण समारंभ पुढे ढकलण्यात आला आहे.अणदूर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा ग्रामदैवत श्री खंडेरायाचे मुख्य पुजारी कै.विठ्ठलराव नारायणराव मोकाशी गुरुजी यांचे चिरंजीव असलेले महेश मोकाशे यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी हा पुरस्कार रोजी जाहीर झाला.
जिल्हा परिषदेच्या (सामान्य प्रशासन ग्रामपंचायत) वतीने प्रत्येक तालुक्यातील एकास आदर्श ग्रामविकास अधिकारी (ग्रामसेवक ) यांना हा पुरस्कार दिला जातो. यंदा तुळजापूर तालुक्यातून महेश मोकाशे यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तुळजापूर तालुक्यातील बोरगाव (तू) येथून सन २००५ साली महेश मोकाशे यांनी आपल्या ग्रामसेवक पदाची कारकीर्द सुरू केली.तालुक्यातील विविध गावांमध्ये २१ वर्ष त्यांनी आपली आदर्श व प्रामाणिक सेवा बजावली आहे.यामध्ये खुदावाडी, शहापूर या मोठ्या ग्रामपंचायतीसह विविध गावांचा समावेश असून त्यांच्या प्रामाणिक कार्याची दखल घेत जिल्हा परिषद धाराशिव यांच्या वतीने हा पुरस्कार जाहीर केला आहे.
आदर्श ग्रामविकास अधिकारी महेश मोकाशे यांचे मितभाषी,कार्यतत्परता व ज्या गावात नोकरी करतात त्या गावातील विकास कामे डोळ्यासमोर ठेऊन असलेले त्यांचे लक्ष यामुळे प्रामाणिक कार्य करण्याची त्यांची शैली आहे.याच त्यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषद (प्रशासन ग्रामपंचायत) यांच्या वतीने त्यांना या पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.महेश मोकाशे यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.





