” बदल हवा तर चेहरा नवा ” या टॅग लाईन खाली “धरणे आप्पा” भाजपा कडून आघाडीवर
नळदुर्ग News धाराशिव लक्षवेध
ऐतिहासिक नळदुर्ग शहरात बदल हवा तर चेहरा नवा या टॅगलाईन खाली बसवराज “अप्पा” धरणे पुन्हा एकदा चर्चेत आलेत.ऐतिहासिक शहर म्हणून जिल्ह्यात ओळखल्या जाणाऱ्या प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या नळदुर्ग नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून अनेकांची नावे चर्चेत आहेत. मात्र सर्वात अधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे मागील वेळेचे लोकप्रिय नगरसेवक बसवराज “आप्पा” धरणे आहे.
विकासाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून शहरांमध्ये अनेक विकास कामांना गती देण्यासाठी लोकप्रिय आमदार राणाजगजितसिंह पाटील व युवा नेते सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला. जुन्या व नवीन या दोन्ही गटातील नागरिकांना व कार्यकर्त्यांना आवडणारे शांत व संयमी व्यक्तिमत्व म्हणून सध्यातरी आप्पा आघाडीवर आहेत.सामाजिक कार्याचा वसा असल्याने राजकारण कमी व समाजकारण जास्त हेच अप्पांच्या कार्याचे गणित आहे. त्यामुळे आजकाल आप्पांची चर्चा गल्लोगल्ली व ठीक ठिकाणी चालू आहे… आप्पाच फिक्स, विकासाचा वादा म्हणजे आप्पा, जनसेवक म्हणजे आप्पा, निपक्षपाती म्हणजे आप्पा… अशा विविध टॅगलाईन खाली आप्पा नळदुर्ग शहरांमध्ये गल्लो गल्ली व ठिकठिकाणी चर्चेत आहेत. सर्व जाती धर्माच्या व सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणीला व कार्याला धावून जाणारा कार्यकर्ता अशी ओळख असणारे आप्पा अगदी कमी वयामध्ये आपल्या सामाजिक व राजकीय कार्याची चुणूक दाखवत आपले नाव सर्वसामान्य जनतेच्या हृदयावर कोरले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या अनेक दावेदारांपैकी सर्वात आघाडीवर असलेले नाव सध्या तरी आप्पांचे आहे. आप्पांच्या कार्याची कामशैली वेगळी असल्याचे सर्वांनाच माहिती आहे.जात,धर्म याच्या पुढे जाऊन आप्पांनी अनेकांची कामे केली. विकास कामे डोळ्यासमोर ठेवून राजकारण केले.याच आप्पांच्या कार्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला “नगराध्यक्ष” पदाच्या उमेदवारीच्या माध्यमातून होऊ शकतो.
अनेक दावेदार असले तरी सर्वांमध्ये प्रबळ दावेदार म्हणून आप्पांकडे पाहिले जाते.त्यामुळेच की काय “बदल हवा तर चेहरा नाव ” आहे अटॅक लाईन केली “आप्पा” पुन्हा चर्चेत आलेत….





