शहापूर जिल्हा परिषद मतदार संघात लक्ष्मण क्षीरसागर यांना भाजप कडून संधी मिळण्याची शक्यता
News धाराशिव लक्षवेध प्रतिनिधी
शहापूर जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपा निष्ठावंत कार्यकर्ते लक्ष्मण क्षीरसागर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली जात आहे.भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते,केशेगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले युवकांच्या मनातील नेता अशी ओळख असलेले लक्ष्मण नागनाथ क्षीरसागर यांना जिल्हा परिषदेसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.लोकनियुक्त आदर्श सरपंच मल्लिनाथ गावडे यांच्या साथीने केशेगाव ग्रामपंचायत मध्ये अमुलाग्र बदल व मोठ्या प्रमाणे विकास कामे केली आहेत. या विकास कामाच्या जोरावरतीच व कार्यकर्तृत्वावरतीच क्षीरसागर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तळागाळातील लोकांचा, महिलांचा व युवकांचा कार्यकर्ता ते सर्वसामान्यांच्या मनातील एक अधिराज्य गाजवणारा माजी उपसरपंच अशी लक्ष्मण क्षीरसागर यांची ख्याती आहे. सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून जाणे. गरजूवंतांना न्याय मिळवून देणे.आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक गावांमध्ये लक्ष्मण क्षीरसागर यांनी युवकांची चांगली फळी निर्माण केली आहे. लक्ष्मण क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाल्यास भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या ठिकाणी विजय होईल यातील मात्र शंका नाही..! मात्र बाहेरील उमेदवार देऊन पक्षाने ही जागा घालवणे भारतीय जनता पक्षाला परवडणारे नाही.? त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांचा रोष लक्षात घेता ज्येष्ठ नेतेमंडळींनी या ठिकाणी मतदारसंघातीलच उमेदवार द्यावा आणि त्यातल्या त्यात लक्ष्मण क्षीरसागर हीच पहिली पसंती असल्याचे बोलले जात आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये क्षीरसागर की आणि कोणी याविषयीचा फैसला लवकरच होईल.?





