शिवसेना अणदूर जिल्हा परिषद विभाग प्रमुखपदी गणेश नरे यांची निवड
—————————————-
हिंदूहृदयसम्राट वंदनीय स्व .बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर स्व.आनंद दिघे यांचे विचार घरोघरी पोहोचवणार
News धाराशिव लक्षवेध
शिवसेना धाराशिव जिल्हा जम्बो कार्यकारणीमध्ये अणदूर जिल्हा परिषद गटाच्या प्रमुखपदी येथील युवा शिवसैनिक गणेश सिद्राम नरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेनेचे उपनेते माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या याबाबतचे पत्र गणेश नरे यांना दिले आहेत.या पत्रामध्ये त्यांनी जिल्हा परिषद गटप्रमुख म्हणून नियुक्त केल्याचे सांगितले आहे. जिल्ह्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर यश मिळाल्यानंतर आता शिवसेनेने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या दृष्टीने पावले उचलले आहेत.यामध्ये संघटनात्मक बदल करून युवकांना संधी देण्याचे कार्य जिल्हाध्यक्ष मोहन पणुरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असताना दिसून येत आहे.
युवा संघटनेच्या माध्यमातून गणेश नरे यांनी अणदूर व परिसरामध्ये पक्ष वाढीसाठी कार्य केले असून शिवसेनेतील फुटी नंतर निष्ठावंत शिवसैनिक म्हणून शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करण्याचे ठरवून पालकमंत्री प्रताप सरनाईक, खा.डॉ श्रीकांत शिंदे, जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी,उपनेते माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर ती कार्य करण्यासाठी व वंदनीय हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर स्व.आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढणे मिळण्यासाठी कार्य करणार असल्याचे न्यूज धाराशिव लक्षवेधशी बोलताना सांगितले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके,शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख गणेश नेपते,युवा सेनेचे तालुकाप्रमुख गणेश पाटील,तुळजापूर शहर उपप्रमुख रमेश चिवचिवे,शहर संघटक नितीन मस्के,संजय लोंढे,बाळू भैय्ये,अनिता लष्करे,स्वप्निल सुरवसे,राम माने यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
फोटो ओळी –
ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारताना गणेश नरे






