शहापूर येथे आमदार राणा पाटील यांच्या हस्ते विविध कामाचे लोकार्पण व उद्घाटन संपन्न
News धाराशिव लक्षवेध प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील शहापूर गावातील विविध विकास कामाचे लोकार्पण व नवीन प्रस्तावितकामाचे उद्घाटन तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते पार पडला. सरपंच उमेश गोरे यांच्या प्रयत्नातून श्री खंडोबा मंदिर सभामंडप लोकार्पण सोहळा, तांडा सुधार योजनेतून आहिल्यानगर विकास कामासाठी १० लक्ष आणि प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारत ६० लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला असून या कामाचा उद्घाटन सोहळा पार पडला.यावेळी सरपंच उमेश गोरे यांच्या सह भाजपा नेते, कार्यकर्ते, वारु मंडळ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, पुढील काळात शहापूर गावासाठी व जिल्हा परिषद संघासाठी मोठ्या प्रमाणात राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.






