अणदूर येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा ; विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण
अणदूर दि.१५ सह संपादक चंद्रकांत हगलगुंडे
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटात संगीत,, कवायत, राष्ट्र भक्ती गीत ,विद्यार्थ्यांची भाषणे तसेच व्यसनमुक्तीची शपथ घेऊन साजरा करण्यात आला.पहाटेपासूनच ग्रामपंचायत कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थांनी स्वच्छता मोहीम हाती घेऊन संपूर्ण परिसर स्वच्छ केले. जव्हार महाविद्यालय, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ विद्यार्थी यांनी गावातील मुख्य रस्त्यावरून भारत माता की जय, वंदे मातरम च्या नाऱ्याने प्रभातपुरी काढण्या आली.
हुतात्मा स्मारक येथे मंडळ अधिकारी डी.पी. गायकवाड, तलाठी कार्यालय तलाठी महादेव गायकवाड, ग्रामपंचायत कार्यालय सरपंच रामचंद्र आलूरे, जवाहर महाविद्यालय प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, जवाहर विद्यालय मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मुख्याध्यापक गोविंद पवार, जिल्हा परिषद कन्या शाळा सुनिता देशमुख, श्री श्री गुरुकुल संकुल येथे संस्थेचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र कानडे, फिनिक्स इंग्लिश स्कूल श्रीशैलं लंगडे, जिजाऊ इंग्लिश स्कूल मुख्याध्यापिका स्वप्ना विशाल शेटे, जिल्हा परिषद वत्सलानगर व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमनाथ लंगडे, जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र संगीता शिरसागर तसेच अंगणवाडी, वाचनालय, महिला मंडळ, विविध क्लासेस येथे मान्यवरांच्या हस्ते ध्वज फडकावून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.