पार्वती कन्या प्रशालेचे निलाप्पा दरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
जळकोट, दि.१४(मेघराज किलजे)
हर घर तिरंगा अभियानांतर्गत जळकोट येथील पार्वती कन्या प्रशालेचे ध्वजारोहण माजी सैनिक निलापा दरेकर यांच्या हस्ते पार पडले.यावेळी संस्थेचे सचिव महेश कदम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यशवंत कदम, कृष्णात मोरे, दत्तात्रय चुंगे, माजी सैनिक भरत पाठक, हरिदास लष्करे, सूर्यकांत सुरवसे, विकास चव्हाण, व गावातील प्रतिष्ठित नागरिक, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. लता सोमवंशी , ज्येष्ठ शिक्षक विजयकुमार मोरे , मडोळे , होटकर , कदम , पाटील, गुड , तळेकर , विशाल कदम व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.