डॉ .ज़ाकिर हुसैन उर्दू शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
जळकोट, दि.१७(मेघराज किलजे)
मुरूम येथील डॉ.झाकीर हुसेन उर्दू हायस्कुलमध्ये भारतीय स्वातंत्र दिन उत्साहात पार पडला.ध्वजारोहण कार्यक्रमानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष रशीद शेख,संस्थेचे सचिव सलीम जमादार ,संचालक मेहमूदमियां बागवान,माशकसाब जमादार यांच्यासह सर्व संचालक व मान्यवर उपस्थित होते. प्रथमतः संस्थेचे संचालक बंदगीसाब कोतवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत व राज्यगीत तसेच देशभक्ती गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी
दहावीतील गुणवंत विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेचे सहशिक्षक रिज़वान बागवान यांनी मनोगत व्यक्त करताना देशाबद्दल अभिमान बाळगावा.स्वातंत्र्यासाठी शूरवीरांनी दिलेल्या बलिदानाची आठवण व त्यांचे कार्य कायम स्मरणार्थ ठेवून देशाबद्दल प्रेम जपावे. क्रांतीवीरांच्या संघर्षाने व त्यागाने मिळालेल्या या स्वातंत्र्याची जपणूक करणे हेच आपले खरे कर्तव्य असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक नूर कानकुर्ति यांनी तर सूत्रसंचालन जुबेर अतार व आभार इम्तियाज जमादार यानी मानले.कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक तसेच शाहजहान पटेल,हनीफ बानगी ,कर्मचारी जौहरबाशा शेख,मेहबूब जमादार,विजय कांबळे,राहिल सय्यद आदि उपस्थित होते.