spot_img
spot_img
spot_img
spot_img

संभाजीनगर शाळेत दहीहंडी उत्साहात ; विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी

संभाजीनगर शाळेत दहीहंडी उत्साहात ; विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी

जळकोट, दि.१७(मेघराज किलजे)

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, संभाजीनगर ,जळकोट येथे दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.

सुरुवातीला भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे व हंडीचे पूजन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार, उपाध्यक्ष शकील मुलाणी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी निळकंठ इटकरी यांनी विद्यार्थ्यांना पारंपरिक सणांचे महत्त्व समजावून सांगितले. मुख्याध्यापिका महादेवी रेणुके यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना परंपरा, एकता आणि सहकार्याची जाणीव ठेवून समाजासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गवळणीवर आकर्षक टिपरी नृत्य सादर करून उपस्थितीताना भारावून सोडले. गोपाळकाला, नृत्य व भजन यांच्या माध्यमातून कृष्ण जन्माचा उत्सव सादर केला. छोट्या गोकुळातील बाळकृष्ण व गोपिकांच्या वेशात आलेल्या बालकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

यानंतर लहान गोविंदांनी पारंपरिक पद्धतीने थर लावून दहीहंडी फोडण्याचा रोमांचक उपक्रम राबविला. गोविंदा आला रे आला या गजराने शाळेचा परिसर दुमदुमून गेला. दहीहंडी फुटताच सर्वत्र जल्लोष झाला. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सामूहिक कार्यभावना अनुभवण्याजोगी होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेणुके , इटकरी , अभिवंत , वनवे , मुरमुरे , चव्हाण , कुडकले , आहेरकर व श्रीकांत कदम यांनी प्रयत्न केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. हा दहीहंडी सोहळा शाळेच्या वार्षिक उपक्रमांमध्ये अविस्मरणीय ठरला असून विद्यार्थ्यांच्या मनावर गोड आठवणींची छाप सोडून गेला.या कार्यक्रमासाठी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने किटचे वाटप 

भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने किटचे वाटप   अणदूर (लक्ष्मण नरे)   तुळजापूर तालुक्यातील जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री खंडोबा श्रीक्षेत्र अणदूर, मैलारपूर, नळदुर्ग देवस्थान...

शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ अनिता मुद्दकण्णा तर व्हाईस चेअरमनपदी अनिल गुरव यांची निवड 

शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ अनिता मुद्दकण्णा तर व्हाईस चेअरमनपदी अनिल गुरव यांची निवड   अणदूर ( लक्ष्मण नरे)   शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी सहकारी सेवकांची सहकारी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!