पार्वती कन्या प्रशालेत झेंडावंदन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
जळकोट , दि.२७(मेघराज किलजे)
घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत पार्वती कन्या प्रशालेत संस्थेचे सचिव श्री. महेश कदम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मार्च -२०२५ मधील इ. १० वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रथम कु.श्रुती हिंडोळे, व्दितीय कु. अस्मिता ठोंबरे , तृतीय कु.अस्मिता यादगौडा तसेच इ. ५ वी ते ९ वीतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त अभियंता श्री. बंकटराव सुरवसे यांचा सत्कार करण्यात आला. प्रशालेच्या विद्यार्थिनी कु. शिल्पा भोसले सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल व कु.गायत्री गंगणे, कु.गौरी टोंपे,कु.वैष्णवी कागे यांची पोस्टमास्तर पदावर निवड व महादेव काळे यांची कृत्रिम रेतन दाता म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
देशभक्तीपर समूहगीते, संगीतमय कवायत, समूहनृत्यगीते सादर करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच अशोकराव पाटील, उपसरपंच श्री.प्रशांत नवगिरे, श्री.कृष्णात मोरे, डॉ. संजय कदम,संचालक श्री. बसवराज कवठे,श्री.ब्रह्मानंद कदम,श्री.भिमाशंकर नाटेकरी, पोलीस पाटील प्रा.देविदास चव्हाण , श्री.सतिश पटणे,श्री.ॲड.सचिन कदम श्री. प्रेमनाथ कदम श्री.नागनाथ पोतदार, श्री.नामदेव कागे,श्री.तानाजी गंगणे, श्री.दिनेश कलाल , श्री सिद्धार्थ लोखंडे, श्री.अमोल ठोंबरे,श्री.परमेश्वर किलजे, श्री.महादेव पवार,श्री. सतिश माळी, श्री.बालाजी पाठक,श्री.मंगेश सुरवसे, सागर राजमाने, बालाजी पालमपल्ले, रवी जाधव, अक्षय कवठे, शकील मुलाणी, बालाजी खोत श्रीमती बालीका राजमाने, सौ.बालीका कदम,सौ.वैशाली कदम,सौ.सत्यशिला कदम सौ.सिंधु लोखंडे,सौ.हिंडोळे, सौ.सुनिता कदम, सौ.अरूणा जाधव, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. लता सोमवंशी-कदम श्री. विजय मोरे, श्री. बसवराज मडोळे, श्री. अभिमन्यू कदम, श्रीमती सुजाता होटकर श्री.पंढरीनाथ कदम, रोहिणी तळेकर श्री. सचिन गुड, विशाल कदम , ज्योत्स्ना लाळे ,सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते.