विकास कामात विश्वासाने काम करण्याची गरज: मारुती खारवे
जळकोट, दि.२१(मेघराज किलजे)
गावातील ग्रामस्थांनी गावच्या विकासात्मक कामासाठी एकमेकांच्या विश्वासाने काम केल्यास गावच्या विकासाला चालना मिळते. तेंव्हा विकास कामासाठी सर्वानी एकत्र येवून काम करणे काळाची गरज आहे.असे प्रतिपादन रिपाइं (आठवले) चे नळदुर्ग शहराध्यक्ष तथा डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मेडियम स्कूल नळदुर्गचे संस्थापक मारूती खारवे यांनी नंदगाव येथे कार्यक्रमात बोलताना केले.
नंदगाव ग्रामपंचायतीच्या नूतन प्रभारी सरपंचपदी शशिकांत बळीराम नागिले यांची बिनविरोध निवड झाल्याबदल त्यांचा मित्र परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा बेरोजगार संस्थेचे सचिव संदीप अगरवाल, ग्रामपंचायत सदस्य कोमल काटे,नंदाबाई कामशेट्टी, मिनाक्षी मोरे,धनराज कलशेट्टी, व्हा. चेअरमन मोहन मोरे, सचिन कोरे, सिद्धाराम जमादार आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून मारुती खारवे हे बोलत होते.
प्रारंभी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुजन करून सरपंच शशिकांत नागिले यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रास्ताविक रिपाइंचे तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे यांनी केले तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एस.के. गायकवाड यांनी केले. आभार दलित पॅथर जिल्हा संपर्क प्रमुख शाम नागिले यांनी मानले. यावेळी ग्रामविकास अधिकारी राहुल कांबळे,बसवराज कोरे, नागू करंडे,डॉ कलकोटे,विशाल मुकदान, चंद्रकांत शिंदे,विठ्ठल घोडके,रोहिदास कांबळे,विकास सोनकांबळे,मरगु सुरवसे, सिताराम मूकदान,नितीन सुरवसे, महादेव माने,अनिल भालेराव, गुंडू कांबळे,विजय कांबळे,संतोष सोनकांबळे,विनायक नागिले,बुद्धा नागिले, नागनाथ बनसोडे, सुधाकर नागिले, अनिल बनसोडे,परमेश्वर चिनगुंडे,अनिरुद्ध कुलकर्णी,नंदकुमार गायकवाड, अप्पू कोरे, महादेव नागिले,दगडू लोखंडे,सविता शिंदे,संगीता जाधव,सविता मुकदान,जयश्री नागिले, भारतबाई मूकदान, पूनम लोखंडे, सविता अगरवाल आदी महिला, ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.