नळदुर्ग, जळकोट मंडळात अतिवृष्टी ; मनसेची ५० हजार अनुदानाची मागणी
जळकोट, दि.२९(मेघराज किलजे)
नळदुर्ग व जळकोट महसूल मंडळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊन अतिवृष्टी झाली आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेला घास पाण्यात गेला आहे.पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामे करण्यात वेळ न घालवता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नळदुर्ग विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार,नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शिरीष डुकरे, रवी राठोड आदीच्या स्वाक्षरी आहेत.