प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी प्रेमनाथ आपचे
जळकोट, दि.३०(मेघराज किलजे)
भुसणी (ता. लोहारा) येथील प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी श्री.प्रेमनाथ आपचे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी मुख्याध्यापकाचा पदाचा त्यांनी पदभार स्वीकारला.प्रेमनाथ आपचे हे १९९९ ला मुरूम येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात माध्यमिक शिक्षक म्हणून रुजू झाले तर २०१७ ला भुसणी येथील प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या शाखेत त्यांची बदली झाली. आता या विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी (दि.२८) रोजी विद्यालयात या नूतन मुख्याध्यापकाचा पदभार कार्यक्रम पार पडला. यावेळी संस्थेचे सचिव व्यंकट जाधव, मुख्याध्यापक उल्हास घुरघुरे (मुरूम), पर्यवेक्षक राधाकृष्ण कोंढारे, विवेकानंद परसाळगे, राजशेखर कोरे, बी. एस. पाटील, इरफान मुजावर, शिवानंद पाटील, महेंद्र गायकवाड, जमीर मुजावर उपस्थित होते. या नियुक्तीनंतर माजी मंत्री बसवराज पाटील, संस्थेचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, माधवराव पाटील महावलिद्यालयाचे प्राचार्य अशोक सपाटे आदींनी अभिनंदन केले आहे.