spot_img
spot_img
spot_img
spot_img

पांचजन्य सामाजिक वाढदिवस महोत्सवाचे आयोजन 

पांचजन्य सामाजिक वाढदिवस महोत्सवाचे आयोजन

अणदूर (लक्ष्मण नरे)

अणदूर पंचक्रोशीतील सर्व सुजाण नागरिक, विद्यार्थी, युवक-युवती, महिला भगिनी यांना प्रेरणा देणारा पांचजन्य सामाजिक वाढदिवस महोत्सव यंदा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. समाजजागृती, सांस्कृतिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा हेतू डोळ्यासमोर ठेवून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजित करण्यात आलेल्या सर्व स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आबा आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

हा महोत्सव सेवानिवृत्त शिक्षक श्री. सुहास कंदले गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते श्री. शिवाजी रतन कांबळे, युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. करबसप्पा (पप्पू) चंद्रकांत धमुरे, मेडिकल क्षेत्रातील डॉ. पंकज बबन घुगे, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते श्री. राजकुमार काशिनाथ गाढवे यांच्या पुढाकाराने आयोजित होत असून, पंचक्रोशीतील नागरिक, विद्यार्थी व युवक-युवतींना आपल्या गुणदर्शनाची संधी मिळणार आहे.

स्पर्धा क्र. १ : गौरी महालक्ष्मी देखाव्याची स्पर्धा (अणदूर शहरापुरती)

या स्पर्धेतून धार्मिकतेसोबतच सामाजिक भान व पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

विषय :
१) सामाजिक जाणीव
२) पर्यावरण संरक्षण
३) स्वच्छता अभियान

सहभागी होणाऱ्यांनी महालक्ष्मी देवीच्या देखाव्याचा व्हिडीओ पाठविणे आवश्यक आहे.

अंतिम तारीख : ०२ सप्टेंबर २०२५

स्पर्धा क्र. २ : तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकलेला चालना देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

विषय : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा शैक्षणिक प्रभाव व करिअरचे भवितव्य

सहभागी : इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी

दिनांक : ०६ सप्टेंबर २०२५

वेळ : सकाळी १० वा.

ठिकाण : हुतात्मा स्मारक, अणदूर

स्पर्धा क्र. ३ : सामान्य ज्ञान स्पर्धा

ज्ञानाचा खजिना उजागर करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सहभागी : इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी

पद्धत : OMR उत्तरपत्रिकेद्वारे परीक्षा

प्रश्नांचा आवाका : गणित, विज्ञान, इंग्रजी, पर्यावरण, चालू घडामोडी व सामान्य ज्ञान

दिनांक : ०६ सप्टेंबर २०२५

वेळ : सकाळी १० वा.

ठिकाण : जि. प. केंद्र प्राथमिक शाळा, अणदूर

बक्षीस वितरण समारंभ

स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

प्रथम पारितोषिक : रु. ५०००/-

द्वितीय पारितोषिक : रु. २१०१/-

तृतीय पारितोषिक : रु. १००१/-

विजेत्यांना सन्मानपत्र व ट्रॉफी देण्यात येईल.

दिनांक : १४ सप्टेंबर २०२५

वेळ : सकाळी १० वा.

ठिकाण : हुतात्मा स्मारक, अणदूर
विशेष आवाहन

पांचजन्य वाढ दिवस महोत्सव समिती व मित्र परिवार, अणदूर यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की,“विद्यार्थ्यांनी, युवक-युवतींनी या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपली कला, ज्ञान व सर्जनशीलता प्रकट करावी. तसेच पंचक्रोशीतील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महोत्सव यशस्वी करावा.”

Karbasappa Dhamure Rajkumar Gadhave Shivaji R. Kamble Pankaj Ghuge #dharashiv #tuljapur #osmanabad

Related Articles

भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने किटचे वाटप 

भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने किटचे वाटप   अणदूर (लक्ष्मण नरे)   तुळजापूर तालुक्यातील जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री खंडोबा श्रीक्षेत्र अणदूर, मैलारपूर, नळदुर्ग देवस्थान...

शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ अनिता मुद्दकण्णा तर व्हाईस चेअरमनपदी अनिल गुरव यांची निवड 

शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ अनिता मुद्दकण्णा तर व्हाईस चेअरमनपदी अनिल गुरव यांची निवड   अणदूर ( लक्ष्मण नरे)   शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी सहकारी सेवकांची सहकारी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!