गरज नसताना नाली खणली ; अणदूर च्या या भागाला कोणी वाली आहे का..?
अणदूर (या भागातील एक संतप्त नागरिक)
अणदूर च्या राष्ट्रीय महामार्ग शेजारील नाली असताना नालीच्या बाजूने आणखीन एक नाली खंदून राष्ट्रीय महामार्गाने अजब कारभार केला आहे. भुजबळ प्लॉटिंग ते चिवरीपाटी दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने पावसाचे पाणी जाण्यासाठी बाजूने नालीखान्यात आली आहे. मात्र ही नाली खंदन्याची गरज नसताना व जुनी नाली असताना नवीन नाली खंदून गजब कारभार राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
या भागातील नागरिकांना जाण्या – येण्यासाठी आज रस्ता नाही. घराच्या समोर भली मोठी नाली खाल्ल्याने नागरिकांना जायचे कसे ? हा प्रश्न पडला आहे. या नालीतून पावसाचे पाणी जावे अशी त्यांची भावना आहे.मात्र पूर्वीच्या पुलापासून पाणी जात होते तो पूल कसा बंद झाला ? तो पूल कुणी बंद केला ? त्या पुलाचे पाणी का जात नाही याची कारणांना शोधता.कोणाचे तरी ऐकून आपली बुद्धी न चालवून त्यांनी रोडच्याकडेने नाली खंदली आहे. मात्र या नालीचा उतार – चढ पाहता.पाणी इकडून – तिकडे जाणे व तिकडून इकडे येणे शक्य नाही.हे माहिती असून सुद्धा केवळ काहीतरी करतो आहे हे दाखवण्यासाठी ही नाली खंदली असल्याचे बोलले जात आहे. पूर्वी पाणी जात असलेला फुल रिकामा केला तर पावसाचे सर्व पाणी या बाजूवरून पलीकडील बाजूस जाते मात्र ते न करता नवीन नालीखंदून पावसाचे पाणी इकडून तिकडे आणि तिकडून इकडे पाठवण्यासाठी प्रयत्न केला आहे.चिवरी पाटीच्या एका पुलातून एवढे पाणी जाईल का ? याचाही विचार गावातील कोणत्या ज्येष्ठ नागरिकांनी किंवा गावकर्त्यांनी केला नाही. यामुळे या भागातील नागरिक या भागास कोण वाली आहे का नाही ? असा प्रश्न विचारत आहेत. नागरिकांची मूळ समस्या लक्षात घेऊन या भागात असलेला जुना पूल उगडून त्या ठिकाणी आणखी दोन नळ्यांची व्यवस्था करून ते पाणी अलीकडून पलीकडे काढता येते. मात्र तसं न करता नाली खंदून पाणी चिवरी पाटीला सोडण्याचा केविलवाणी प्रयत्न महामार्गाने केला आहे. मात्र लोकप्रतिनिधी आणि गावचे कर्ते – धर्ते याकडे लक्ष देणार का ? आणि ही समस्या सोडवणार का ? हे पाहणे गरजेचे आहे. नालीत पडून कोणाचा अपघात झाल्यास किंवा दुखापत झाल्यास यास कोण ? जबाबदार असेल. या नागरिकांनी जायचे कुठून ? हा प्रश्नही आजही अनुत्तरीत आहे. प्रशासन आणि गावकर्ते यावरती काय निर्णय घेतात हे पाहणे गरजेचे आहे.
गटारी नाल्या कायम तुंबलेल्या – या भागातील गटारी व नाल्या कायम तुंबलेल्या असतात. रस्त्याच्या एका बाजूला नाली असल्याने या नाली मधून या भागातील सर्व पाणी जाते. तेनाली भरल्यानंतर या नालीतील कचरा काढला जात नाही त्यामुळे हे पाणी रस्त्यावरून जाते.

भाग 1…क्रमशः