spot_img
spot_img
spot_img
spot_img

पूरग्रस्तांसाठी अणदूरच्या एम जी ग्रुपच्या वतीने किट व साहित्याचे संकलन

पूरग्रस्तांसाठी अणदूरच्या एम जी ग्रुपच्या वतीने किट व साहित्याचे संकलन

अणदूर दि.२८ सप्टेंबर

 

तुळजापूर तालुक्यातील अणदूरच्या एम जी ग्रुपच्या वतीने पूरग्रस्त भागासाठी नागरिकांसाठी विविध माध्यमातून साहित्य व कीटचे संकलन सध्या करण्यात येत आहे.मंडळाच्या माध्यमातून जवळपास ५० ते ६० किट तयार करण्यात आले असून ४०० ते ५०० साड्या व इतर लागणारे साहित्य मंडळाचे कार्यकर्त्यांनी स्वतःच्या घरातील एकत्रितपणे जमा केले आहे.

दि. २ ऑक्टोंबर रोजी हे सर्व साहित्य पूरग्रस्त भागासाठी पाठवण्यात येणार आहे.तरी ज्या नागरिकांना मदत करावी. आपल्या बांधवांवरती संकट आल्याने त्यासाठी एम जी ग्रुपने घेतलेला पुढाकार सर्वांसाठी आदर्श आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याची आवाहन या माध्यमातून करण्यात येत आहे.तरी १ ऑक्टोबर पर्यंत एम जी ग्रुप किंवा एम जी वाचनालय महादेव गल्ली येथे आपले मदत साहित्य द्यावे.या माध्यमातून भरघोस पद्धतीने सहकार्य पुरग्रस्तांना करण्यात येणार असून यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा ही भावना ठेवून एम जी मंडळ कार्य करत आहे.तरी नागरिकांनी त्यांच्या कार्याला सहकार्य करावे.

सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे एमजी ग्रुप –

गणेश उत्सवामध्ये पर्यावरण पूरक गणेशोत्सव, मंडळाच्या माध्यमातून वाचनालय, विविध सामाजिक उपक्रम, वृक्षारोपण, शैक्षणिक स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सेवानिवृत्त सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार, पत्रकार बांधवांचे हस्ते गणेश पूजा व सर्वधर्मसमभाव अशी शिकवण देणारे मंडळ म्हणून जिल्हाभर नावलौकिक मिळवले आहे. पूरग्रस्तांसाठी मदत संकलन करण्याचे कार्य करून पुन्हा एकदा या मंडळांनी सामाजिक जाणीव सर्वांना निर्माण करून दिली आहे. इतर गणेश मंडळांनीही यांचा आदर्श घेत या ग्रस्तांसाठी मदत संकलन करण्याची गरज आहे.

Related Articles

भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने किटचे वाटप 

भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने किटचे वाटप   अणदूर (लक्ष्मण नरे)   तुळजापूर तालुक्यातील जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री खंडोबा श्रीक्षेत्र अणदूर, मैलारपूर, नळदुर्ग देवस्थान...

शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ अनिता मुद्दकण्णा तर व्हाईस चेअरमनपदी अनिल गुरव यांची निवड 

शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ अनिता मुद्दकण्णा तर व्हाईस चेअरमनपदी अनिल गुरव यांची निवड   अणदूर ( लक्ष्मण नरे)   शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी सहकारी सेवकांची सहकारी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!