जवाहर विद्यालयात चाईल्ड हेल्प लाईन जनजागृती कार्यक्रम
——————————————–बालविवाह टाळण्यासाठी घेतली शपथ व केला निर्धार ….
अणदूर News धाराशिव लक्षवेध
जवाहर विद्यालय, अणदूर येथे आज (8 नोव्हेंबर) रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण कक्ष,धाराशिव यांच्या वतीने जनजागृती कार्यक्रम संपन्न करण्यात आला.जनजागृती कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी होते.
सकाळी परिपाठात विकास चव्हाण,जिल्हा प्रकल्प समन्वयक,अभय काळे, वंदना कांबळे,समुपदेशक प्रज्ञा बनसोडे,जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सामाजिक कार्यकर्त्या यांनी विद्यार्थ्यांना बालविवाह, बालकामगार,बालकांचे अधिकार,बालकाच्या अधिकाराचे हनन,समाजातील विविध चालीरीती,पध्दती, बालकांच्या संरक्षणार्थ केलेले कायदे,चाईल्ड हेल्प लाईनची आवश्यकता व गरज याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.बालविवाहाबाबत माहिती सांगत असताना मुलीचे वय अठरा व मुलाचे वय एक्केवीस असावे लागते,जर या वयाच्या आत लग्न होत असेल,आई-वडील बळजबरीने विवाह लावत असतील तर, घरात लग्नाचा विचार होत असेल,छेडछाड होत असेल तर तात्काळ हेल्प लाईन 1098 डायल करून माहिती द्यावी, समाजातील विविध सामाजिक समस्या त्यावर शासनाने केलेले कायदे,विद्यार्थी,नागरिक म्हणून आपली जबाबदारी,मुलींनी पाऊल वाकडे टाकू नये, आपल्याकडून चुक झाली की आई-वडील विवाह लावतात, त्यासाठी जीवनात एका ध्येयाने प्रेरित होऊन शैक्षणिक प्रगती करावी,चित्रपट – मालिका यामधील प्रेमप्रकरण म्हणजे आयुष्य नव्हे,त्याचे कुठेतरी अनुकरण होताना सतत दिसते, ते फक्त मनोरंजनात्मक आहे हेही लक्षात ठेवावे,चांगल्या बाबींचे अनुकरण करावे, बाल लैंगिक अत्याचार,चांगला स्पर्श,वाईट स्पर्श याबाबत ही समुपदेशन केले.बालसंगोपन योजनेबाबत माहिती व मिळणारे लाभ सांगतील.शेवटी बालसंगोपनात्मक,विवाह प्रतिबंधात्मक सामुदायिक शपथ घेतली तसेच चाईल्ड हेल्प लाईन व माहितीपत्रक विद्यार्थ्यांना वाटप केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सिध्देश्वर मसुते यांनी केले.. यावेळी सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.






