spot_img
spot_img
spot_img
spot_img

केशेगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी मल्लिनाथ महाबोले यांची बिनविरोध निवड

केशेगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी मल्लिनाथ महाबोले यांची बिनविरोध निवड

 

अणदूर, धाराशिव लक्षवेध

 

तुळजापूर तालुक्यातील केशेगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी मल्लिनाथ महाबोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विशेष ग्रामसभेचे अध्यक्षस्थानी लोकनियुक्त आदर्श सरपंच मल्लिनाथ गावडे हे होते. यावेळी निवड प्रक्रिया विस्तार अधिकारी डी.एस. निडगिरे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली तर ग्रामसेवक तांबोळी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली.यावेळी मल्लिनाथ महाबोले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.निवडीनंतर गुलालाची उधळण करीत जल्लोष करण्यात आला.यावेळी मल्लिनाथ महाबोले यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदन वर्षाव केला जातो आहे.

या निवड प्रक्रियेवेळी मावळते उपसरपंच लक्ष्मण नागनाथ क्षीरसागर, ग्रामपंचायत सदस्य शंकर सिद्राम घंटे, सौ सविता मारुती पवार, सौ प्रभावती धोंडीबा जाधव, महबूब इस्माईल फकीर, सौ अश्विनी प्रदीप हुकिरे व शोभा कमलाकर बागडे यांची उपस्थिती होती.यावेळी भाजप तालुका सरचिटणीस पद्माकर जेवळे, युवा नेते शिवा हुकिरे, युवा उद्योजक गणेश कुताडे, शिवानंद बिराजदार,चिदानंद हदराळे,योगीनाथ जळकोटे,मल्लिनाथ जळकोटे,कल्याण पाटू,मारुती पवार, दयानंद महाबोले,उमेश महाबोले,झाकीर फुलारी,अज्जू नदाफ,दीपक पाटू यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

बामूचा अर्थसंकल्प : केवळ आकड्यांचा खेळ नको, तर हवा विकासाचा ‘मॅनिफेस्टो’! –  डॉ. सतिश गावित

बामूचा अर्थसंकल्प : केवळ आकड्यांचा खेळ नको, तर हवा विकासाचा 'मॅनिफेस्टो'! -  डॉ. सतिश डी. गावित   धाराशिव लक्षवेध प्रतिनिधी दि.२२   (लेखक हे सिनेट सदस्य, डॉ. बाबासाहेब...

पत्रकार शंकर दुपारगुडे यांना “द पिलर्स ऑफ हिंदुस्तानी सोसायटी पुरस्कार जाहीर. ——————————————- अणदूरचे सुपुत्र दुपारगुडे यांच्या पञकारीतेतील योगदानाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर...

पत्रकार शंकर दुपारगुडे यांना “द पिलर्स ऑफ हिंदुस्तानी सोसायटी पुरस्कार जाहीर. ------------------------------------------- अणदूरचे सुपुत्र दुपारगुडे यांच्या पञकारीतेतील योगदानाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल     धाराशिव लक्षवेध प्रतिनिधी दि....

ताज्या बातम्या

error: Content is protected !!