spot_img
spot_img
spot_img
spot_img

मालकांच्या प्रतिष्ठेची …दादांच्या अस्तित्वाची लढाई…! ———————————————— नळदुर्ग नगरपरिषदेवर कमळ फुलणार  – सुनील मालक चव्हाण यांची ग्वाही

मालकांच्या प्रतिष्ठेची …दादांच्या अस्तित्वाची लढाई…!

————————————————
नळदुर्ग नगरपरिषदेवर कमळ फुलणार  – सुनील मालक चव्हाण यांची ग्वाही

 

News धाराशिव लक्षवेध

नळदुर्ग नगर परिषद निवडणुकीत विकासाला चालना देण्यासाठी अग्रक्रमाने भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व त्यांचे सहकारी निष्कलंक व शहराच्या विकासाला प्राधान्य देणारे असल्याने होऊ घातलेल्या निवडणुकीत निर्विवाद यश संपादन करतील असा विश्वास तुळजापूर तालुक्याचे युवा नेते तथा प्रचार प्रमुख सुनील मालक चव्हाण यांनी बोलताना व्यक्त केले.

नगरपालिका अस्तित्वाला आल्यापासून काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे हे नाकारता येत नाही. मात्र केवळ राजकारणाचे व स्वहितच जपण्यापलीकडे शहरवासीयांच्या पदरात काहीही घडले नसल्याचे खंत व्यक्त करून आ. राणा दादा पाटील यांच्या भक्कम सहकार्य व पाठिंबामुळे विविध विकासात्मक योजना राबवून सर्वसामान्य जनतेच्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे अग्रभाग असल्याची भावना मालकांनी व्यक्त केली.राजकारणातील चार दशकातील चढ-उतार आपण प्रत्यक्षात पाहिले असून नळदुर्ग शहरासह तालुक्याला ऊर्जेतावस्ता देऊन शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील योगदान दादांचे अतुलणीय आहे.वजाबाकीचे राजकारण आपण आयुष्यात कधीच केले नसल्याचे सांगून स्व.हित बाजूला सारून बेरजेचे राजकारण केल्याचे स्पष्ट सांगत नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत राणा दादांच्या नेतृत्वाखाली सकारात्मक विचार करून आपण सर्वस्व पणाला लावून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न नव्हे तर काळजीने रान पेटवणार याची ग्वाही यावेळी बोलतात दिली.

राजकारणात चढउतार ही बाब खरे असले तरी शहराच्या विकासासाठी देशात, राज्यात, जिल्ह्यात किंबहुना शहरात कमळा शिवाय पर्याय नाही. यासाठी जाणकार मतदारानी जातीपातीचे, सगे-सोयऱ्याचे , राजकारण न करता व अल्पशा भूलथापांना बळी न पडता सर्वांगीण विकासासाठी आप्पांच्या नेतृत्वाखाली सर्वांना संधी देऊन शहराचे विकासाला चालना देण्याचे मागणी केली.

Related Articles

शहापूर येथे आमदार राणा पाटील यांच्या हस्ते विविध कामाचे लोकार्पण व उद्घाटन संपन्न 

शहापूर येथे आमदार राणा पाटील यांच्या हस्ते विविध कामाचे लोकार्पण व उद्घाटन संपन्न News धाराशिव लक्षवेध प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील शहापूर गावातील विविध विकास कामाचे लोकार्पण व...

अणदूर मधील दोन कोटी रुपयांच्या विकास कामाचे आमदार पाटील यांच्या हस्ते लोकार्पण  — जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – आमदार राणाजगजितसिंह पाटील 

अणदूर मधील दोन कोटी रुपयांच्या विकास कामाचे आमदार पाटील यांच्या हस्ते लोकार्पण --------------------------------------- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध - आमदार राणाजगजितसिंह पाटील News धाराशिव लक्षवेध जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!