श्री श्री गुरुकुल येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
अणदूर, दि.१५ ऑगस्ट (लक्ष्मण नरे)
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री श्री गुरुकुल येथे ७९ स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यामंदिरामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ जितेंद्र कानडे यांच्या हस्ते भारत माता व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व सामूहिक ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव तथा उपसरपंच डॉ नागनाथ कुंभार,माजी सभापती दीपक आलुरे,माजी सरपंच धनराज मुळे,ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण घोडके – पाटील सदस्या स्नेहाताई मुळे,हनुमंत घुगे गुरुजी, श्रीमंत मुळे गुरुजी, काळे गुरुजी,गुरव गुरुजी, व्यवस्थापन समिती सदस्य डॉ हरिदास मुंडे,पत्रकार संजीव आलूरे,शिवशंकर तिरगुळे,गुणवंत मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर सावंत यांनी तर आभार सुरेखा काटे यांनी मानले.यावेळी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी श्याम नाना आलुरे,संजीव आलुरे,विलास मुळे,शशिकांत मोकाशे,राम भांडरकवठे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.