spot_img
spot_img
spot_img
spot_img

जवाहर विद्यालयात’ भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ; विविध कार्यक्रम ‘ 

जवाहर विद्यालयात’ भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ; विविध कार्यक्रम ‘

 

अणदूर दि.१५ ऑगस्ट (लक्ष्मण नरे)

 

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शिक्षण प्रसारक मंडळ, अणदूर चे विद्यमान सचिव रामचंद्र  आलुरे, मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन केले तर ध्वजारोहण गोपाळ कुलकर्णी  यांनी केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नळदुर्ग पोलिस स्टेशनचे सपोनि श्रीमती अमृता पटाईत,सपोनि विकास राठोड ,अणदूर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कल्याणी  मुळे,ग्रा.प.सदस्य बालाजी घुगे हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र आलुरे आणि प्रमुख पाहुणे, मान्यवरांच्या शुभहस्ते शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील प्रत्येक वर्गातून प्रथम गुणवंत विद्यार्थीbकुमारी सानवी सुशांत आलुरे,विराक्षी विक्रम आलुरे,आर्या सुशांत आलुरे,कल्याणी गोपाळ गरड, भक्ती रामेश्वर कबाडे यांना प्रत्येकी 1000/- रूपये रोख स्वरूपात पारितोषिक देऊन सन्मानित केले.प्रभातफेरी झाल्यानंतर श्री.बसवेश्वर वस्तीगृहासमोरील प्रांगणावर एन.सी.सी.मानवंदना,संचलन,कवायत प्रकार सादरीकरण करण्यात आले.यावेळी विद्यार्थी सुरक्षा समितीचे तज्ञ सदस्य, सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोकराव चिंचोले ,सेवानिवृत्त मुख्याध्यापक निलकंठ नरे गुरुजी,महावीर कंदले,बापू कांबळे गुरूजी, मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी  उपस्थित होते.

विद्यालयातील ध्वजारोहण व मैदानावरील कार्यक्रमास गावातील सर्व प्रतिष्ठीत मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी, सेवानिवृत्त गुरूजन, मुख्याध्यापक,पालक,माजी विद्यार्थी,तंटामुक्त समितीचे सर्व सदस्य,विविध वृत्तपत्र समुहाचे पत्रकार बंधू उपस्थित होते.भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी क्रीडा विभाग प्रमुख जयहिंद पवार सर,ठाकरू राठोड सर,एन.सी.सी.विभागप्रमुख .मकरंद पाटील,युवा प्रशिक्षणार्थी दादाराव घोडके,प्रणीलकुमार बनसोडे,अंकुश मोकाशे,उमेश नरे,सर्व प्राध्यापक,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित मोरे यांनी केले तर आभार मकरंद पाटील यांनी केले.

Related Articles

भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने किटचे वाटप 

भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने किटचे वाटप   अणदूर (लक्ष्मण नरे)   तुळजापूर तालुक्यातील जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री खंडोबा श्रीक्षेत्र अणदूर, मैलारपूर, नळदुर्ग देवस्थान...

शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ अनिता मुद्दकण्णा तर व्हाईस चेअरमनपदी अनिल गुरव यांची निवड 

शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ अनिता मुद्दकण्णा तर व्हाईस चेअरमनपदी अनिल गुरव यांची निवड   अणदूर ( लक्ष्मण नरे)   शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी सहकारी सेवकांची सहकारी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!