spot_img
spot_img
spot_img
spot_img

श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यात्रा अलोट भाविकांच्या उपस्थितीत थाटात संपन्न ; टाळ-मृदंगाची साथीने,भक्तीमय वातावरणात पालखी ग्रामभ्रमणाणे यात्रेची सांगता.

श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यात्रा अलोट भाविकांच्या उपस्थितीत थाटात संपन्न ; टाळ-मृदंगाची साथीने,भक्तीमय वातावरणात पालखी ग्रामभ्रमणाणे यात्रेची सांगता.

मुरूम बातमीदार दि २१ ऑगस्ट

उमरगा तालुक्यातील मुरूम येथे श्रावण मासात ग्रामदैवत श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यात्रा महोत्सव थाटात संपन्न झाला.प्रतिवर्षा प्रमाणे यात्रेनिमित्र जिल्हा बँकेचे चेअरमन बापूराव पाटील यांच्या मार्गदर्शनार्थ, युवानेते प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली- शिवमहापुराणाचे आयोजन करण्यात आले होते. पुराण प्रवचक: षष्टस्थल प्रबोधक पूज्य श्री अन्नदानेश्वर स्वामीजी यांच्या मधुरवाणीने संगीतकार :- गानरत्न अशोकय्या हिरेमठ तबलावादक :- अशोक पट्टारा यांच्या संगीत साथीने दि. २८ जुलै ते २० ऑगस्ट पर्यंत शिवमहापुराण सोहळा पार पडला याप्रसंगी असंख्य महिला भगिनीं, भावीक भक्तांनी पुराणाचे लाभ घेतले. दि. २१ वार गुरुवार रोजी श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन पालखीचे ग्राम भ्रमणानंतर यात्रेचे सांगता संपन्न झाले.दि.२० रोजी रात्री १२ वाजून १० मिनिटाला अग्नी पेठवण्यात आले, सकाळी अतिशय भक्तिमय वातावरणात विधिवत पूजन संपन्न झाल्यानंतर पालखी पुरंत आणि सदभक्तांच्या उपस्थित अग्नी प्रवेश झाला. प्रारंभी श्री हनुमान चौकातून पालखी ग्राम प्रदक्षिणा साठी सुरुवात झाले. अतिशय भक्तिमय वतातवरणात पुरंत यांचे पारंपारिक खेळी, विविध भजने मंडळे, विविध समाजाचे नंदी कोलचा उत्स्फूर्तपणे सहभाग होता. ग्रामदैवत श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यात्रा बापूराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२१ वार गुरुवार रोजी जल्लोषात संपन्न झाले, सकाळी दहा वाजता श्री. कपिलसिद्ध मल्लिकार्जुन पालखी अग्नी प्रवेश करून नगर प्रदक्षिणास सुरुवात झाली. श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन पालखीत असंख्य भाविक भक्तीत तल्लीन झाले होते. अष्टगी,लोणी, भोसगे परिवाराच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे त्यांच्या घरून वाजत गाजत कुंभ कळस घेऊन आले. प्रारंभी अग्नी प्रवेशा नंतर हुनुमान चौकात श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यांच्या पालखीचे भक्तिमय वातावरणात व पुरंत खेळून पूजन संपन्न झाले त्यानंतर पालखी नगर प्रदक्षिणा साठी निघाली, यादरम्यान असंख्य महिला भगिनी डोक्यावर कुंभकळस घेऊन ग्रामप्रदक्षिणा मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. त्याच बरोबर मुरूम शहरातील मातंग,परीट, सुतार समाजाचे मानाचे दिंडीचाही उत्साहात सहभाग झाला होता, शहरातील विविध भजनी मंडळानेही पालखीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला, शहरातील सोनार गल्ली, अशोक चौक, भाजी मंडई, डोंगरे गल्ली,टिळक चौक, किसान चौक, सुभाष चौक,गांधी चौक या पालखी मार्गावर भाविक भक्तांनी रांगोळीने व त्याच बरोबर पालखी पूजन करून व पालखी वर पुष्पवृष्टी करून ठिकठिकाणी स्वागत केले, डोंगरे परिवाराच्या वतीने भक्तासाठी दुधाचा प्रसादाचे वाटप केले, गांधी चौकात दुर्गे परिवाराच्या वतीने चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती, मंदिर समितीच्या वतीने प्रदक्षिणा दरम्यान सदभक्तांना अल्पउपहार, पाण्याची सोय करण्यात आली होती. टाळ, मृदंग, ढोल-ताश्यानी भक्तिमय वातावरणात श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन जयघोषाणे मुरूम नगरीतुन पालखी सोहळा हजारो नागरिकांच्या सहभागाने संपन्न झाले. सुभाष चौकातून पालखी गांधी चौकाकडे मार्गस्थ झाले यावेळी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन बापुराव पाटील यांनी श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन पालखीचे दर्शन घेतले. कपिलेश्वर मंदिर देवस्थानच्या वतीने श्री.कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त दरवर्षी पुराणाचे आयोजन केले जाते, पालखी प्रदक्षिणा नंतर यात्रा महोत्सवाचे सांगता संपन्न झाले. अतिशय भक्तिमय वातावरणात श्री.कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यात्रा उत्साहात संपन्न झाले, यात्रा व संपूर्ण सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मंदिर समिती अध्यक्ष प्रशांत पाटील मित्र मंडळाच्य वतीने परिश्रम घेतले.शरण पाटील फौंडेशनच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पालखी प्रदक्षिणा नंतर हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Related Articles

भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने किटचे वाटप 

भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने किटचे वाटप   अणदूर (लक्ष्मण नरे)   तुळजापूर तालुक्यातील जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री खंडोबा श्रीक्षेत्र अणदूर, मैलारपूर, नळदुर्ग देवस्थान...

शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ अनिता मुद्दकण्णा तर व्हाईस चेअरमनपदी अनिल गुरव यांची निवड 

शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ अनिता मुद्दकण्णा तर व्हाईस चेअरमनपदी अनिल गुरव यांची निवड   अणदूर ( लक्ष्मण नरे)   शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी सहकारी सेवकांची सहकारी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!