spot_img
spot_img
spot_img
spot_img

शरण पाटील फाऊंडेशन व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने शेत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शरण पाटील यांच्या हस्ते शुभारंभ 

शरण पाटील फाऊंडेशन व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने शेत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शरण पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

(मुरुम बातमीदार)

शरण पाटील फाऊंडेशन व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी हिप्परगा रवा, शिवकर वाडी, लोहारा खु. व खेड येथील शेत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन भाजपाचे युवा नेते शरण बसवराज पाटील व उपविभागीय अधिकारी दत्तात्रय शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
शेतकरी बांधवांची मागणी लक्षात घेऊन शेतीमाल बाजारात लवकर दाखल व्हावा यासाठी शेतापर्यंत रस्ते असणे गरजेचे आहे. शेतरस्ते, शिवरस्ते व पाणंद रस्ते मजबूतीकरण करण्याचा निर्णय घेऊन, शेतकरी हित जपण्याचा उद्देशाने, उमरगा व लोहारा तालुक्यातील शेतरस्ते महाराष्ट्रात आदर्श पॅटर्न करण्याचा संकल्प करुन ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांच्या लोकवाट्याची सर्वस्वी जबाबदारी शरण पाटील फाऊंडेशनने स्वीकारली आहे. संकल्पाचे सिध्दीत रुपांतर करण्यासाठी लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा, शिवकर वाडी, लोहारा खु. व खेड येथील शेतरस्ते कामाचे भारतीय जनता पक्षाचे युवा नेते तथा उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण बसवराज पाटील व उपविभागीय अधिकारी दत्तात्रय शेवाळे यांच्या हस्ते मंगळवारी (दि.२६) भूमिपूजन करण्यात आले. यावेळी तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, जिपचे उप विभागीय अभियंता दिलीप बिराजदार, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, योगेश राठोड, बाजार समितीचे सभापती प्रशांत काळे, नितीन पाटील, हरी लोखंडे, बाबा सुर्यवंशी, विजय लोमटे, हिप्परगा (रवा) सरपंच अभिमान कांबळे, खेडचे सरपंच राजश्री कांबळे, महेश माशाळकर, ब्रम्हानंद पाटील, बालाजी वडजे, व्यंकट रसाळ, लोहारा (खु.) चे सरपंच सचिन रसाळ, वि. पांढरीचे सरपंच मारुती कार्ले, विनोद मोरे, आप्पा होनाळकर, सुनिल जाधव, सिध्देश्वर गव्हाळे, व्यंकट पाटील आदीसह हिप्परगा रवा, शिवकर वाडी, लोहारा खु. व खेड येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने किटचे वाटप 

भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने किटचे वाटप   अणदूर (लक्ष्मण नरे)   तुळजापूर तालुक्यातील जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री खंडोबा श्रीक्षेत्र अणदूर, मैलारपूर, नळदुर्ग देवस्थान...

शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ अनिता मुद्दकण्णा तर व्हाईस चेअरमनपदी अनिल गुरव यांची निवड 

शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा डॉ अनिता मुद्दकण्णा तर व्हाईस चेअरमनपदी अनिल गुरव यांची निवड   अणदूर ( लक्ष्मण नरे)   शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे गुरूजी सहकारी सेवकांची सहकारी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!