जय महाकाल गणेश मंडळातर्फे विशाल गरड यांच्या व्याख्यानाचे आयोजन
जळकोट, सा.धाराशिव लक्षवेध दि.३१(मेघराज किलजे)
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील श्री केदारलिंग नगर भागातील आदर्श गणेश मंडळ पुरस्काराने सन्मानित जय महाकाल गणेश तरुण मंडळाच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त प्रसिद्ध लोकव्याख्यानकार विशाल गरड यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम दि.२ सप्टेंबर (बुधवार) रोजी आयोजित करण्यात आला आहे. हे व्याख्यान सायंकाळी ७ वाजता जळकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार आहे. विशाल गरड हे कालचे स्वराज्य आजचे मावळे या विषयावर व्याख्यान देणार आहेत. तरी व्याख्यान कार्यक्रमाचा सर्व गणेश मंडळे, नागरिक, युवक, महिला तसेच जळकोट व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन जय महाकाल गणेश तरुण मंडळाने केले आहे.