पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयटीआयमध्ये स्वच्छता पंधरवडा
जळकोट, दि.१८(मेघराज किलजे)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत स्वच्छता पंधरवडा संपूर्ण राज्यात साजरा केला जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत भाई उद्धवराव पाटील शासकीय आय.टी.आय. धाराशिव यांच्यावतीने तालुक्यातील कार्यरत एक खेडेगाव निवडून सिद्धेश्वर वडगाव येथील मुख्य रस्त्यापासून ते मंदिरापर्यंतचा परिसर सर्व शासकीय आयटीआय व बीटीआरआय ,धाराशिव यांच्यावतीने साफसफाई करून सेवा पंधरवडाची सुरुवात करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कौशल्य ,रोजगार ,उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत संचालयानाच्या सूचनेनुसार दि. १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामच्या ध्वजवंदनानंतर संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थी कर्मचारी यांनी सकाळी स्वच्छता अभियान राबवून सेवा पंधरवडयाला सुरुवात केली. याप्रसंगी शासकीय आयटीआयचे गटनिदेशक श्री. एस. टी. राऊत, श्री. जगताप एफ.बी., कार्यालयीन अधीक्षक श्री. एम.बी.पिसे, शिल्पनिदेशक श्री. सुतार आर.वी.,श्री. सुरवसे ए. डी., श्री. सौदागर आर.डी., श्री. टेकाळे ,कांबळे ,श्री. नाईक के, डी., श्री. वाघमारे बी.जी.,श्री. सुशांत शिंदे, पाटील एस. एस., भोकरे पी.जी.व सर्व प्रशिक्षणार्थी ,चतुर्थश्रेणी कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.