टुडे समाचारचे संपादक हुकूमत मुलानी यांच्या हृदयविकाराच्या धक्क्यांनी निधन ; ग्राउंड रिपोर्टर हरवला
अणदूर (लक्ष्मण नरे)
मन सुन्न करणारी बातमी हुकूमत भाई, तुम्ही खूप लवकर गेलात काही बातम्यांवर विश्वास ठेवणं खूप जड जातं. ‘टुडे समाचार’ युट्यूब चॅनलचे संपादक आणि आमचे मित्र, हुकूमत मुलानी (वय ५६) आता आपल्यात नाहीत, हे मन मानायलाच तयार नाही. आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.एखादी बातमी मिळाली की बाईक काढून जिल्हाभर धावणारा, लोकांचे प्रश्न तळमळीने मांडणारा एक सच्चा पत्रकार आज कायमचा शांत झाला. त्यांचा उत्साह, कामावरची निष्ठा आणि प्रत्येकाशी आपुलकीने बोलण्याचा स्वभाव कायम आठवणीत राहील.तुमच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
साप्ताहिक धाराशिव लक्षवेधच्या वतीने हुकूमत भाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली!