तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत जळकोट प्रशालेचे यश
जळकोट, दि.२०(मेघराज किलजे)
धाराशिव जिल्हा क्रीडा अधिकारी व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा तुळजापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या मैदानावर पार पडल्या. या स्पर्धेत जळकोट येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या खेळाडूंनी यश संपादन केले आहे.
या स्पर्धेमध्ये संध्या भीम काळे हिचा लांब उडीमध्ये द्वितीय क्रमांक,लक्ष्मी तमन्ना कुंभार हिचा हर्डल्स मध्ये द्वितीय क्रमांक आला तर साक्षी भैरू जाधव हिचा गोळा फेक या प्रकारात तृतीय क्रमांक आला. या तिन्ही खेळाडूंना समाधान पवार यांचे मार्गदर्शन लागले. शाळेचे मुख्याध्यापक संतोष सारणे ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वीरभद्र पिसे, उपाध्यक्ष विजय पिसे व सर्व समिती सदस्य, शिक्षकवृंद पुष्पलता कांबळे, जयराम शिंदे, रविंद्र डावरे,बसवराज पुरंत , गोपाळ बंदपट्टे, वैष्णवी कदम, स्नेहा माने तसेच गावातील सर्व शिक्षणप्रेमी नागरिक यांनी अभिनंदन केले आहे.