पार्वती कन्या प्रशालेच्या वेदिका छत्रे, राधिका राठोड द्वितीय
जळकोट, दि.२०(मेघराज किलजे)
तुळजापूर तालुका पावसाळी शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत जळकोट येथील पार्वती कन्या प्रशालेच्या इ. ९ वी वर्गातील विद्यार्थिनी कु.वेदिका धनराज छत्रे ८०० मीटर व कु.राधिका राजू राठोड १०० मीटर १७ वर्षाखालील मुलींच्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये तुळजापूर तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.या दोन्ही विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. क्रीडाशिक्षक श्री. पंडित कदम व मुलींचे प्रशालेचे सचिव श्री.महेश कदम, उपाध्यक्ष श्री.बसवराज कवठे, संचालक श्री.ब्रह्मानंद कदम ,मुख्याध्यापिका सौ. लता सोमवंशी व सर्व शिक्षक वृंद, गावकरी यांनी अभिनंदन केले आहे.