पायी जाणाऱ्या भाविकांसाठी जय मल्हारच्या वतीने पानपोई
जळकोट, दि.२२(मेघराज किलजे)
महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेश राज्यातून तुळजापूरला नवरात्र महोत्सवासाठी पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी जळकोट येथील जय मल्हार एक्वा कूलच्यावतीने राष्ट्रीय महामार्गावरील जिल्हा परिषद शाळेसमोर मोफत शुद्ध पाण्याची सोय करण्यात आली आहे. या पानपोईचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जय मल्हार ॲकवाचे विजय बारदाने, सुरज बारदाने, राम वारकड, विनोद पांचाळ, संजय बारदाने, चंद्रकांत रणसुरे, व्यंकट बारदाने, केशव बारदाने आदि उपस्थित होते.जय मल्हार एक्वा कुलच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.