वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र; रोहित, रितिका मानेंचा सत्कार
जळकोट, दि.२२(मेघराज किलजे)
कैकाडी समाजातून एकाच कुटुंबातील दोघांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाल्याबद्दल तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे मोरे कुटुंबियांच्यावतीने सत्कार करण्यात आला.जळकोट येथील भानुदास माने यांची नात – नातू सन २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेत (नीट) रोहित अमोल माने व रितिका अजित माने यांनी चांगले मार्क्स घेऊन वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र झाले आहेत. रोहित माने यांना मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तर रितिका माने हिचा बीडीएसच्या वैद्यकीय शिक्षणासाठी परभणी येथे प्रवेश मिळाला आहे.विशेषतः एकाच कुटुंबात तीन डॉक्टर होण्याचा आदर्श कैकाडी समाजासमोर ठेवला आहे. यापूर्वी माने कुटुंबीयातील डॉ. रोहन माने हे एमबीबीएस झाले असून सध्या ते मुंबई येथे वैद्यकीय सेवा देत आहेत. अमोल माने हे सामाजिक चळवळीत कार्यरत असून सध्या धाराशिव येथे त्यांचे वास्तव्य आहे. उबाठा गटाचे तुळजापूर तालुका संघटक कृष्णात मोरे व मोरे कुटुंबियांच्यावतीने रोहित माने व रितिका माने यांचा सत्कार करण्यात आला.