धोंडीबा बिराजदार कडून महादेव मंदिराला एक लाख आठ हजार रुपयांची देणगी
जळकोट, दि.२२(मेघराज किलजे)
जळकोट येथून जवळच असलेल्या हंगरगा (नळ)येथील मूळ रहिवासी असलेले व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे दौंड तालुका अध्यक्ष धोंडीबा बिराजदार यांनी महादेव मंदिराच्या मंदिर बांधकामासाठी १ लाख८००० रुपयाची देणगी दिली आहे.
महादेव मंदिर ट्रस्टच्यावतीने फुरसुंगी (पुणे) येथील तूकाई दर्शन येथे शिवा नंदिकेश्वर महादेव मंदिराचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम महादेव मंदिर ट्रस्टच्यावतीने करण्यात येत आहे. धोंडीबा बिराजदार यांनी कै. भारतबाई बिराजदार यांच्या स्मरणार्थ एक लाख आठ हजार रु. देणगीचा धनादेश महादेव मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द केले. यावेळी उद्योजक प्रदीप हत्ते, ट्रस्टचे खजिनदार रोहिदास बेलुरे, किसन खडके, प्रशांत बिराजदार, सिद्राम पाटील, हांडे व बिराजदार कुटुंबीय उपस्थित होते.