spot_img
spot_img
spot_img
spot_img

साप्ताहिक ‘धाराशिव लक्षवेध’च्या शुभारंभ अंकाचे थाटात प्रकाशन!

साप्ताहिक ‘धाराशिव लक्षवेध’च्या शुभारंभ अंकाचे थाटात प्रकाशन!

अशोकभाऊ जगदाळे यांच्या हस्ते प्रकाशन; नळदुर्गातील मान्यवरांची उपस्थिती, शुभेच्छांचा वर्षाव

नळदुर्ग (प्रतिनिधी) : पत्रकारिता क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात करणाऱ्या साप्ताहिक ‘धाराशिव लक्षवेध’च्या प्रथम शुभारंभ अंकाचे प्रकाशन उत्साहपूर्ण वातावरणात थाटात संपन्न झाले. दृष्टि उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री. अशोकभाऊ जगदाळे तसेच श्री गुरुकुलचे मुख्याध्यापक व ज्येष्ठ पत्रकार श्री. लक्ष्मण नरेसर यांच्या शुभहस्ते या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

या प्रकाशन सोहळ्याला नळदुर्ग शहरातील विविध क्षेत्रांतील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून साप्ताहिकाच्या नव्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, सदस्य विलासजी येडगे, नगरसेवक तथा नळदुर्ग नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मारुती खारवे, नगरसेवक आकाश कुलकर्णी, इमाम शेख, गफूरभाई कुरेशी, फारुखभाई कुरेशी, इनामदार अफसर, जहागीरदार, दुर्वास बनसोडे, प्रा. दीपक जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते राजू मोठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नळदुर्ग शहरासह धाराशिव जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, जनहिताचे प्रश्न आणि विकासकामांवर प्रकाश टाकण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

साप्ताहिक ‘धाराशिव लक्षवेध’च्या या पहिल्याच अंकाच्या प्रकाशन सोहळ्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित मान्यवरांनी साप्ताहिकाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य घडावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Related Articles

उपोषणाचे गांभिर्य नाही का? नळदुर्ग शहरातील अतिक्रमण काढन्यात यावे या करीता शहरातील तरुण नगरपालिके समोर आज सकाळ पासुन उपोषणास बसले आहेत. परंतु हा विषय नगरपालिकेने...

धाराशिव लोकसभा मतदारसंघ राजकारणातील बदलामुळे कात टकत आसुन आगमी काळात जिल्ह्याची धुरा नव्या नेतृत्वा कडे गेल्यास प्रस्तापित बड्या राजकारन्याचे गढ उध्वस्त

धाराशिव लोकसभा मतदारसंघ राजकारणातील बदलामुळे कात टकत आसुन आगमी काळात जिल्ह्याची धुरा नव्या नेतृत्वा कडे गेल्यास प्रस्तापित बड्या राजकारन्याचे गढ उध्वस्त होतिल असे चिञ...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!