उपोषणाचे गांभिर्य नाही का?
नळदुर्ग शहरातील अतिक्रमण काढन्यात यावे या करीता शहरातील तरुण नगरपालिके समोर आज सकाळ पासुन उपोषणास बसले आहेत. परंतु हा विषय नगरपालिकेने आजुन तरी गांभिर्याने घेतलेला दिसत नाही.
ज्या व्यक्तींना जनतेने डोळे झाकुन मतदान केले व सत्ये पर्यंत पोहंचवले तेच आज खुर्चिवर बसल्यावर समस्या सोडवन्या ऐवजी पळवाट काढताना दिसत आहेत ही नळदुर्ग करांसाठी खरीच शोकांतिका आहे. शहरातील वाढते अतिक्रमण हा एक ज्वलंत प्रश्न आहे आणी या कडे कोणीही कानाडोळा करुच शकत नाही. जो विषय आज तरुणांनी लोकशाही पध्दतीने अवलंबिला आहे. तो वाखानन्याजोगा आसून याला कोणाचा विरोध असन्याचे कारण नाही.
परंतु जे आज न. प. मध्ये सत्तधिश झालेत. त्यांनी याचा आज विचार करायलाच हवा. व उपोषण कर्त्या बरोबर चर्चा करुन मार्ग काढायला हवा.
म्हातारी मेल्याचे दुख: नाही काळ सोकावता कामा नये.साप्ताहिक ‘धाराशिव लक्षवेध’च्या शुभारंभ अंकाचे थाटात प्रकाशन!







