भाजपा कडून “आप्पा” धरणे आघाडीवर ; सर्वसामान्य जनतेशी नाळ व मोठा युवक वर्ग पाठीमागे. यामुळे प्रमुख दावेदार ..!
News धाराशिव लक्षवेध
ऐतिहासिक शहर म्हणून जिल्ह्यात ओळखल्या जाणाऱ्या प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या नळदुर्ग नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून अनेकांची नावे “नगराध्यक्ष” पदासाठी चर्चेत आहेत. मात्र सर्वात अधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे मागील वेळेचे लोकप्रिय नगरसेवक, भाजपा नळदुर्ग तालुका अध्यक्ष बसवराज “आप्पा” धरणे आहे. शहराच्या विकासात अनेक वर्ष काँग्रेसमध्ये राहून प्रामाणिक कार्य केले.विविध विकास मुद्दे पूर्ण करण्यासाठी युवा नेते सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आप्पांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.विकासाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून शहरांमध्ये अनेक विकास कामांना गती देण्यासाठी लोकप्रिय आमदार राणाजगजितसिंह पाटील व युवा नेते सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामे पूर्णही झाली काही होत आहे.जुन्या व नवीन या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना आवडणारे शांत व संयमी व्यक्तिमत्व म्हणून सध्यातरी आप्पा आघाडीवर आहेत.सामाजिक कार्याचा वसा असल्याने राजकारण कमी व समाजकारण जास्त हेच अप्पांच्या कार्याचे गणित आहे.
सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणीला व कार्याला धावून जाणारा कार्यकर्ता अशी ओळख असणारे आप्पा अगदी कमी वयामध्ये आपल्या सामाजिक व राजकीय कार्याची चुणूक दाखवत आपले नाव सर्वसामान्य जनतेच्या हृदयावर कोरले आहे.भारतीय जनता पक्षाच्या अनेक दावेदारांपैकी सर्वात आघाडीवर असलेले नाव सध्या तरी आप्पांचे आहे. आप्पांच्या कार्याची शैली वेगळी असल्याचे सर्वांनाच माहिती आहे.जात,धर्म याच्या पुढे जाऊन आप्पांनी अनेकांची कामे केली.शहराचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून राजकारण केले.याच कार्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला “नगराध्यक्ष” पदाच्या उमेदवारीच्या माध्यमातून होऊ शकतो.अनेक दावेदार असले तरी सर्वांमध्ये प्रबळ दावेदार म्हणून आप्पांकडे पाहिले जाते.
सामाजिक कार्य हेच ध्येय —
बसवराज आप्पा धरणे यांचे सामाजिक कार्य खूप मोठे आहे. अनेक धार्मिक कार्यामध्ये व सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेऊन ते कार्य पार पाडणे हे त्यांच्या कामाची शैली आहे. कोरोना काळामध्ये बाहेरगावातील नागरिकांना जेवणाची व्यवस्था करणे. किराणा किडची वाटप करणे. गोरगरीब व गरजू कुटुंबातील विवाहांना मदत करणे. विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये अन्नदान करणे. यास अनेक सामाजिक कार्य त्यांनी केली आहेत. परंतु कधीच या कार्याचा गवगवा न करता सामाजिक कार्य करत राहणे हीच त्यांची वृत्ती आहे.
मोठा युवक वर्ग पाठीशी –
नळदुर्ग शहरातील अनेक गणेश मंडळाचे युवक, पदाधिकारी यांच्यासह पंचक्रोशीत आप्पा धरणे यांना मानणारा मोठा युवक वर्ग आहे. युवकांच्या अडचणींना धावून जाणे. त्यांचे प्रश्न सोडवणे. त्यांच्या व्यवसायिक व इतर कार्यामध्ये सहकार्य करणे. त्यांचे प्रश्न समजून घेणे व मार्गी लावणे यामुळे मोठा युवक वर्ग आप्पांच्या पाठीशी आहे.यामुळे होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीत सध्या तरी युवकांमधून आप्पांच्या नावाची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे उमेदवारीचे पारडे जड असल्याचे दिसून येते.मात्र भाजपाची वरिष्ठ नेतेमंडळी काय निर्णय घेतात याकडे पाहणे गरजेचे आहे.





